शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मांत्रिकांना सरकार देणार मानधन, प्रशिक्षणही; मेळघाटातील आदिवासींच्या उपचारांसाठी ऑफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2023 07:20 IST

मेळघाटात कुपोषण, माता-बालमृत्यूचा प्रश्न कायम असल्याने ८ वर्षांपूर्वी प्रशासनाने भूमकांची मदत घेऊन त्यांना रुग्णालयात येण्याचे आवाहन केले.

- नरेंद्र जावरेपरतवाडा (जि. अमरावती) : पुरोगामी महाराष्ट्रात आदिवासी रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणा खुद्द भोंदूबाबा मांत्रिकांच्या (भूमका) दारात पोहोचली आहे. भूमकांनी रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी त्यांना रुग्णालयात रेफर करण्यास पुढाकार घ्यावा व प्रतिरुग्ण शंभर रुपये मानधन मिळवावे, अशी ऑफरच दिली आहे. यासाठी मंगळवारपासून दोन दिवसीय प्रशिक्षण धारणी, चिखलदरा तालुक्यांत होणार आहे. 

मेळघाटात कुपोषण, माता-बालमृत्यूचा प्रश्न कायम असल्याने ८ वर्षांपूर्वी प्रशासनाने भूमकांची मदत घेऊन त्यांना रुग्णालयात येण्याचे आवाहन केले. मात्र, आर्थिक मोबदला नसल्याने भूमकांचा प्रतिसाद नव्हता. त्यामुळे पुन्हा तज्ज्ञ डॉक्टरांचे प्रशिक्षण आणि रुग्ण कल्याण समितीकडून भूमकांना मानधन मिळणार आहे. 

भूमकांची संख्या ६०१ 

धारणीत ३१५, तर चिखलदरा तालुक्यात २८६ असे ६०१ भूमका आहेत. आदिवासी उपचारासाठी आधी भूमकाकडे, गरजेनुसार रुग्णालयात जातात. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि रुग्ण दगावतात. अनेकदा उपचाराच्या नावावर चिमुकल्यांना विळा तापवून चटके दिल्याच्या घटना घडल्या आहेत. 

आदिवासी रुग्णाचा एक जीव जरी वाचला तरी तो लाखमोलाचा ठरेल. याच चांगल्या हेतूने आरोग्य विभागाने भूमकांसाठी दोन दिवस प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.  - दिलीप रणमले,  जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र