शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

प्रियकराला झटक्यात श्रीमंत करू इच्छिणारी प्रेयसी पोहोचली कोठडीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2022 23:35 IST

भातकुली तहसीलसमोरील एका अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून चोरांनी २५० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार ८ ऑक्टोबर रोजी नोंदविण्यात आली होती. मात्र, पुढे चोरीला गेलेले सोन्याचे दागिने २५० ग्रॅमपेक्षा जास्त असून, सोबतच प्लॉट विक्रीतून आलेली २० लाखांची रोखसुद्धा चोरांनी पळविल्याचे फिर्यादी महिलेने सांगितले होते. तपासादरम्यान सीसीटीव्हीने पोलिसांना अनेक पुरावे दिले. तरुणीने तिच्या प्रियकराला माहिती दिल्यानंतर ती चोरी झाल्याचे निष्पन्न झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  अत्यंत जवळच्या नातेवाइकाच्या घरातील रोख व सोन्याच्या दागिन्यांबाबत टीप देऊन ती चोरी यशस्वी करण्यात लाखमोलाचा सहभाग असलेली तरुणी अखेर गजाआड झाली. प्रियकराला झटक्यात श्रीमंत करू इच्छिणाऱ्या त्या प्रेयसीला फ्रेजरपुरा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली, तर अन्य दोन आरोपींकडून चोरीला गेलेले सुमारे ११ लाख ८ हजार रुपयांचे २७७ ग्रॅम सोने व २० लाख रुपये रोख, असा ३१ लाख ७८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. ठाणेदार अनिल कुरळकर यांच्या नेतृत्वातील ‘टीम फ्रेजरपुरा’ने हे बंपर यश मिळविले.भातकुली तहसीलसमोरील एका अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून चोरांनी २५० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार ८ ऑक्टोबर रोजी नोंदविण्यात आली होती. मात्र, पुढे चोरीला गेलेले सोन्याचे दागिने २५० ग्रॅमपेक्षा जास्त असून, सोबतच प्लॉट विक्रीतून आलेली २० लाखांची रोखसुद्धा चोरांनी पळविल्याचे फिर्यादी महिलेने सांगितले होते. तपासादरम्यान सीसीटीव्हीने पोलिसांना अनेक पुरावे दिले. तरुणीने तिच्या प्रियकराला माहिती दिल्यानंतर ती चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. सबब,  फ्रेजरपुरा पोलिसांनी शोएब खान मंजूर खान (२३, रा. ताजनगर), शेख जुबेर शेख ताज (३१, रा. सुफियाननगर) व शेख जुबेरच्या १९ वर्षीय प्रेयसीला अटक केली. संपूूर्ण ३१ लाख रुपयांची जप्ती अवघ्या दोन- तीन दिवसांमध्ये केल्याने ‘टीम फ्रेजरपुरा’चे काैतुक केले जात आहे. तरुणी ही तंत्रनिकेतन तृतीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. 

तरुणीलाही अटक फिर्यादी महिलेच्या पतीची जवळची आप्त असलेल्या १९ वर्षीय तरुणीने तिचा प्रियकर शेख जुबेरला त्या घरातील दागिने व रोख रकमेबाबत माहिती दिली. चोरीच्या वेळी ती तरुणी घटनास्थळाच्या शेजारी कारमधून आत बाहेर करताना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्या कारमुळे संपूर्ण प्रकरणाचा तत्काळ उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, चोरीचा संपूर्ण माल जुबेरने स्वत:कडे ठेवला होता. पोलिसांनी त्याच्या घरातून दागिने व रोख, कारदेखील जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अनिल कुरळकर, पीआय नितीन मगर व निशिकांत देशमुख, नीलेश जगताप, शशिकांत गवई, विनोद काटकर यांनी केली.  

आरोपींकडून २० लाखांची रोख व २७७ ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले. याप्रकरणी शुक्रवारी एका तरुणीलादेखील अटक करण्यात आली. न्यायालयाने तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.-अनिल कुरळकर, ठाणेदार, फ्रेजरपुरा

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी