शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

जुळ्या शहरातील गरिबांच्या नशिबी पानी पानी रे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2022 05:00 IST

मेळघाटच्या पाण्यावर परतवाडा, अचलपूर शहराच्या पायथ्याशी तीन प्रकल्प उभारले. त्यातून जुन्या शहरासह अंजनगाव, दर्यापूर आणि आता चांदूरबाजार तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा होईल. जुळ्या शहरात आलेली मुख्य पाईपलाईन आठ टाक्यांना जोडण्यासोबत गर्भश्रीमंत भागात थेट जोडले गेल्याची माहिती खास सूत्राने ‘लोकमत’ला दिली. 

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पंधरा किलोमीटर अंतरावरील चंद्रभागा प्रकल्पातून सुरू असलेला पाणीपुरवठा गर्भश्रीमंतांसाठी की सर्वसामान्य गोरगरिबांसाठी, असे म्हणायची वेळ आली आहे. संतप्त नागरिकांना शांत करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अचलपूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कोट्यवधीचा घोळ व लिकेजच्या नावावर लाखो रुपये काढण्यात येत असल्याची चर्चा बरीच बोलकी आहे. जीवनावश्यक पाणीपुरवठा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात ‘अ’ वर्ग नगरपालिका ‘ढ’ ठरली आहे. 

श्रीमंत भागात चौथ्या माळ्यावर पाणी? परतवाडा शहरातील गर्भश्रीमंत परिसरात राहणाऱ्या व्यापारी व इतर नागरिकांच्या कॉलनी परिसरात पाण्याची ओरड होतच नाही. त्यामुळे गरिबांसाठी मृत असलेली योजना फक्त श्रीमंतांसाठी अमृत ठरली आहे. गोरगरिबांसाठी लावण्यात आलेल्या स्टँड पोस्ट नळातून पाण्याचा थेंब कधी पडतो, याची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या गरिबांची अवस्था, तर दुसरीकडे गर्भश्रीमंतांच्या चौथ्या माळ्यावर पोहोचणारे पाणी अनियमितता स्पष्ट करते.

स्लम एरियात दुर्लक्षजुळ्या शहरात अनेक हल्ले, कॉलन्या आहेत. त्यामध्ये परतवाडा शहरातील कैकाडीपुरा, पेन्शनपुरा, मुगलाईपुरा, तारानगर व इतर भाग आहेत. अचलपूर शहरातील हीरापुरा, दिलदारपुरा, देवळी, सरमसपुरा, गांधी पूल, हनवतपुरा, जुना बस स्टँड परिसर अशा अनेक भागांचा समावेश आहे.

का मिळत नाही गरिबांना पाणी? मेळघाटच्या पाण्यावर परतवाडा, अचलपूर शहराच्या पायथ्याशी तीन प्रकल्प उभारले. त्यातून जुन्या शहरासह अंजनगाव, दर्यापूर आणि आता चांदूरबाजार तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा होईल. जुळ्या शहरात आलेली मुख्य पाईपलाईन आठ टाक्यांना जोडण्यासोबत गर्भश्रीमंत भागात थेट जोडले गेल्याची माहिती खास सूत्राने ‘लोकमत’ला दिली. 

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई