शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लाल तोंडाच्या माकडाची विदेशात तस्करी प्रकरण विधिमंडळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2022 15:14 IST

‘लोकमत’ने २३ मे २०२२ रोजी ‘लाल तोंडाच्या माकडाची विदेशात होतेय तस्करी’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर वन विभागातील यंत्रणा सजग झाली.

ठळक मुद्देपावसाळी अधिवेशनात गाजणार, विधानमंडळ सचिवांचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना पत्र

अमरावती : लाल तोंडाच्या माकडाची (लंगूर) विदेशात तस्करी होत असल्याचे प्रकरण राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजणार आहे. यासंदर्भात राज्याच्या वन विभागाने कोणत्या उपाययाेजना केल्यात, याविषयी विधानमंडळ सचिवांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना २८ जून रोजी पत्र पाठवून माहिती मागविली आहे. याप्रकरणी विधानपरिषदेत तारांकित प्रश्न क्रमांक १३९१४ दाखल झाला आहे.

डब्ल्यूसीसीबी ही संस्था सीबीआयच्या समकक्ष असून, भारतातून विदेशात होणाऱ्या वन्यजीवांच्या तस्करींवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते. त्याअनुषंगाने डब्ल्यूसीसीबीच्या अतिरिक्त संचालक तिलोत्तमा वर्मा यांनी भारतातील सर्व प्रधान मुख्य वनसंरक्षकांना ५ मे २०२२ रोजी एका पत्राद्वारे लालतोंड्या माकडांच्या तस्करीसंदर्भात अलर्ट केले.

धक्कादायक! लाल तोंडाच्या माकडाची विदेशात तस्करी, अमेरिकेत संशोधनाची मोठी मागणी

वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कक्षेत येणाऱ्या लाल तोंडाच्या माकडावर लॅबोरेटरी कार्पोरेशन ऑफ अमेरिका येथे संशोधन करण्यात येत आहे. त्यामुळे भारतातील लाल तोंडाच्या माकडाची मागणी वाढली आहे. लाल माकडांचे वास्तव्य असलेल्या भागात विशेष लक्ष देण्याच्या सूचना वन विभागाला देण्यात आल्या आहेत. विधानमंडळ सचिवालयाचे सिद्धेश सावडेकर यांच्या पत्रानुसार राज्याच्या वन विभागात लाल तोंडाच्या माकडांची कुठे-कुठे तस्करी झाली, आरोपींची संख्या, आरोपींची पार्श्र्वभूमी, तस्करी रोखण्यासाठीच्या उपाययोजना आदींची माहिती मागविली आहे.

'लोकमत'ने वेधले लक्ष

‘लोकमत’ने २३ मे २०२२ रोजी ‘लाल तोंडाच्या माकडाची विदेशात होतेय तस्करी’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर वन विभागातील यंत्रणा सजग झाली. एवढेच नव्हे, तर दिल्लीच्या वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने (डब्ल्यूसीसीबी) लाल तोंड्या माकडाची अमेरिकेत संशोधनासाठी मागणी वाढल्याचे देशभरात अलर्ट केले होते.

टॅग्स :MonkeyमाकडAmravatiअमरावतीSmugglingतस्करी