शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टर अडकला पंचायत समिती पथकाच्या कचाट्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 15:06 IST

Amravati : पदवी बनावट, ओपीडी रजिस्टर नाही, अॅलोपॅथीचा सर्रास वापर

अनिल कडूलोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : 'झोलाछाप' हे विशेषण ज्यांच्यासाठी वापरले जायचे, अशा बोगस डॉक्टरांचे माहिती-तंत्रज्ञानाचे दालन एका क्लिकवर असलेल्या या युगातही फावले असल्याचे मोठ्या लोकसंख्येच्या अचलपुरात उघडकीस आले आहे. शहरात मागील दीड ते दोन वर्षापासून प्रॅक्टिस करीत असलेल्या बोगस डॉक्टरची गुरुवारी अचलपूर पंचायत समितीच्या पथकाने पोलखोल केली. त्याच्याकडील पदवी बोगस आहे. ओपीडी रजिस्टर नावालाही नाही. अॅलोपॅथीच्या औषधांचा सर्रास वापर करणाऱ्या या डॉक्टरकडून त्याने फलकावर नमूद केलेल्या शस्त्रक्रियेसंबंधी अवजारे दाखविण्यास नकार देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. 

पथकाच्या माहितीनुसार, पी. के. मंडल असे या कथित वैद्यकीय व्यावसायिकाचे नाव आहे. अचलपूर पोलिसांकडून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना संबंधित डॉक्टरच्या चौकशीकरिता पत्र प्राप्त झाले. या पत्राच्या अनुषंगाने अचलपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर अरबट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल सुरेश दहीकर, विस्तार अधिकारी सुधाकर पवार यांनी अचलपूर शहरातील बिलनपुरास्थित पाताळेश्वर मंदिरासमोरील झेंडा चौकातील पी. के. मंडल याच्या दवाखान्यात गुरुवारी धडक दिली.

अचलपूर तालुक्यातील चाचोंडी येथील शरद वसंतराव पेढेकर (३०) यांनी अचलपूर पोलिस ठाण्यात १४ जून रोजी पी. के. मंडल याच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यांचे वडील वसंतराव नामदेवराव पेढेकर यांच्यावर मूळव्याधीच्या अनुषंगाने त्याच्याकडून उपचार करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. त्यामुळे त्यांना परतवाडा येथील दोन खासगी डॉक्टरांकडे उपचारार्थ नेले आणि प्रकृती खालावल्यामुळे अमरावती  येथील खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यामुळे पी. के. मंडल याच्याविरुद्ध तक्रार देत त्याच्या वैद्यकीय पार्श्वभूमीची चौकशी करण्याची मागणी केली होती.

डॉक्टरकडे असलेली पदवी बनावट असल्याचे चौकशी पथकाच्या निदर्शनास आले. अॅलोपॅथी औषधी वापरण्याचे, हाताळण्याचे ज्ञान नसताना तो ते हाताळत असल्याचे आढळले. चौकशीदरम्यान त्याच्याकडे कुठलेही ओपीडी रजिस्टर आढळून आले नाही. केवळ कुठल्या रुग्णाकडून किती रुपये घेतले याच्या नोंदी असलेली नोंदवही आढळून आली. शस्त्रक्रियेची शस्त्रे दाखविण्यास चौकशी पथकाला त्याने नकार दिला. पथक चौकशीच्या अनुषंगाने अहवाल अचलपूर पोलिस ठाण्यात सादर करणार आहे. या अहवालाच्या अनुषंगाने अचलपूर पोलिस संबंधित डॉक्टरविरुद्ध गुन्हे दाखल करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

संबंधित डॉक्टरच्या दवाखान्याला भेट देऊन चौकशी केली. उपलब्ध माहितीवरून या प्रकरणातील अहवाल तयार करून तो पोलिसांकडे पाठविला जाईल. पोलिस पुढील कारवाई करतील. - डॉ. किरण शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती, अचलपूर

टॅग्स :fraudधोकेबाजीAmravatiअमरावती