शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

संतोष बांगर यांच्या वाहनावर हल्ला योग्यच, अंबादास दानवेंची शिवसैनिकांच्या पाठीवर थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 10:59 IST

आमदार संतोष बांगर यांच्या वाहनावरील हल्लाबोल प्रकरण घटनेत सहभागी शिवसैनिकांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.

वनोजा बाग / अंजनगाव सुर्जी (अमरावती) : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या वाहनावर अंजनगावात शिवसैनिकांनी केलेला हल्ला योग्यच होता, असे म्हणत शिवसेना नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांच्या पाठीवर थाप दिली.

अंजनगाव सुर्जी येथे देवनाथ मठाच्या दर्शनाहून परतणाऱ्या आ. संतोष बांगर यांचे वाहन अडवून त्यावर शिवसैनिकांनी हल्ला करून ‘कुणी माझ्या गाडीला टच करून दाखवेल तर...’ हे आव्हान पूर्ण केले होते. या घटनेत सहभागी शिवसैनिकांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, अंबादास दानवे हे अमरावती जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी यांच्यासह अंजनगावात दाखल झाले. त्यांनी नवीन बस स्टॅण्ड येथे शिवसैनिकांशी संवाद साधला.

तुमची कृती योग्यच होती. त्यामुळे आमदार बांगर यांच्या गाडीवर हल्लाबोल करणाऱ्या शिवसैनिकांच्या धाडसी कृतीचे कौतुक करणे गरजेचे ठरते. शिवसेनेला तुमचा अभिमान आहे, असे कौतुक त्यांनी केले. आ. दानवे यांचे स्वागत तालुकाप्रमुख कपिल देशमुख, शहरप्रमुख राजेंद्र आकोटकर, महेंद्र दिपटे, गजानन लवटे आदींनी केले. अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणAmbadas Danweyअंबादास दानवेMLAआमदारAmravatiअमरावती