शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आमला-पुलगाव आर्मी महामार्गाची केली खड्ड्यांनी चाळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 11:55 IST

Amravati : राज्य महामार्गाच्या देखभालीकडे उपविभागीय बांधकाम अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा बाजार : आमला ते पुलगाव या आर्मी महामार्गाची दैनावस्था झाली आहे. संवेदनशील असलेल्या या राज्य महामार्गाच्या देखभालीकडे उपविभागीय बांधकाम अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. या महत्त्वपूर्ण मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. जागोजागी खड्डे व रस्त्याच्या कडेला वाढलेल्या खुरट्या झुडपांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

वरुड ते हातुर्णापर्यंत आर्मी महामार्ग अतिशय क्षतिग्रस्त झाला आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता, हे कळायला मार्ग नाही. रस्ताच हरवल्यासारखे खड्डे पडल्याने दररोज अपघात घडत असून, राष्ट्रीय महामार्ग विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसत आहे. आमला ते पुलगाव हा मिलिटरी रस्ता वरुडवरून हातुर्णामार्गे पुढे नागपूर-अमरावती या राष्ट्रीय हायवे क्रमांक ६ ला तळेगाव येथे मिळतो. या रस्त्याची दर्जोन्नती करून हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. वरुड तळेगाव या महामार्गावर अतिशय खड्डे पडले असून, खड्डे चुकविण्याच्या नादात दररोज अपघात घडतात. राजुरा बाजार ते हातुर्णापर्यंत आठ किलोमीटरपर्यंतचा रस्ता अतिशय हलाखीचा झाला असून खड्ड्यांत हरविला आहे. या रस्त्यावर निव्वळ खड्डयांचे साम्राज्य आहे. बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दखल घेत किमान डागडुजी व पावसाळ्यापूर्वी डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दोन वर्षांपासून डागडुजी नाही आर्मी महामार्गाच्या दुरुस्तीबाबत यापूर्वी माजी सभापती विक्रम ठाकरे यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. तथापि, दोन वर्षापासून साधी डागडुजीही नाही. दिशादर्शक फलक नाही. काटेरी झुडपे रस्त्यावर आली आहेत. खड्डा चुकविण्याच्या नादात अनेक दुचाकीचालकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

सततची वर्दळआमला-पुलगाव महामार्ग वरुडहून राजुरा मार्गे हातुर्णाला जातो. राजुरा बाजार हे गाव हिरव्या मिरचीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. गुरांची मोठी बाजारपेठ आहे. वर्दळीच्या दृष्टीने या मार्गाची देखभाल सातत्याने होणे गरजेचे असताना बांधकाम उपविभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच आतादेखील आहे. फक्त सिमेंट रोड हा एनएचएआयकडे आहे.- ईश्वरानंद पनपालिया, अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती

आमचा नियमित रहदारीचा हा रस्ता आहे. परंतु या रस्त्याची चाळण झाल्यने अनेकांना मणक्याचे आजार जडले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याची दखल घेत किमान तातडीने डागडुजी व पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्यात यावे.- दामोदर ताथोडे, बेलोरा (ताथोडे), ता. वरुड

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाGovernmentसरकार