शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

त्या' बोगस पीएच.डी. पदव्यांची तपासणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:29 IST

Amravati : 'जेजेटीयू'ला पाच वर्षांसाठी बंदी; यूजीसीची कारवाई

गणेश वासनिक लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बोगस पीएच.डी. संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) राजस्थानमधील जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठावर (जेजेटीयू) कठोर कारवाई करत पाच वर्षासाठी पीएच.डी. नोंदणीवर बंदी घातली आहे.

या पार्श्वभूमीवर यूजीसी सचित मनीष जोशी यांनी देशभरातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना अशा संशयास्पद पीएच.डी. पदवीधारकांची तपासणी करण्याचे निर्देश एका पत्राद्वारे दिले आहेत.

राजस्थान येथील जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाने बोगस पीएच.डी. पदवी दिल्याचे दिसून आले. यूजीसीच्या स्थायी समितीला जेजेटीयूने पीएच.डी.साठी आवश्यक शैक्षणिक निकष आणि नियमांचे पालन न केल्याचे आढळून आले. विद्यापीठाला स्पष्टीकरणासाठी संधी दिली गेली. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने विद्यापीठाला पीएच.डी.च्या नोंदणीपासून रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यूजीसीने जेजेटीयू विद्यापीठाला २०२५-२६ ते २०२९-३० या पाच वर्षांसाठी पीएच.डी. प्रवेश बंद करण्याचे आदेश दिले आहेत.स्थायी समितीने दिलेल्या शिफारशी लक्षात घेऊन जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाला पीएच.डी. अंतर्गत संशोधकांची नोंदणी रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढील पाच वर्षांचा कार्यक्रम म्हणजे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ते २०२९-३० पर्यंत यूजीसीच्या या निर्णयाची माहिती जेजेटीयूला देण्यात आली असून पीएच.डी.ची नोंदणी तत्काळ बंद करण्याचे निर्देशही दिले आहेत.

जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठात कोणत्याही विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी प्रवेश घेऊ नये, यूजीसीच्या मान्यतेअभावी पीएच.डी., उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या उद्देशाने मान्यताप्राप्त पदवी वैध मानली जाणार नाही.

महाराष्ट्रात बोगस पीएच.डी. पदवी किती?यूजीसीच्या सचिवांनी १२ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्यातील विद्यापीठांना पाठविलेल्या पत्रानुसार जेजेटीयूने दिलेल्या पीएच.डी. पदवी शोधून काढणे आव्हानात्मक ठरणार आहे. काही महाभाग बोगस पीएच.डी.च्या आधारे चार्य, प्रोफेसर यासह विविध क्षेत्रांत शैक्षणिक, आर्थिक लाभ घेत आहेत. परंतु, राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाला महाराष्ट्रात बोगस पीएच.डी. पदवीधारक किती, हे शोधावे लागणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती