शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

एसआरपीएफ बँडकडून चौकाचौकांत नागरिकांचे आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 23:45 IST

जिल्हाधिकारी  शैलेश नवाल व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, एसडीओ उदयसिंह राजपूत, तहसीलदार व  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, मंडळ अधिकारी  ढोक  यांची यावेळी उपस्थिती होती. कोरोना प्रादुर्भाव थांबविण्याकरिता वेळोवेळी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. याबाबत अनेक नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व जिल्हा प्रशासनाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.

ठळक मुद्देकोरोनाकाळात नागरिकांचे सहकार्य, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाकाळात सर्वच समाजघटकांच्या सहकार्याची  जाणिव ठेवून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह एसआरपीएफचे बँड पथक शहराच्या चौकाचौकांत देशभक्तीपर धून वाजवून आभार व्यक्त करीत आहेत व याचसोबत कोरोना संसर्गाविषयीची जनजागृती करीत आहे.जिल्हाधिकारी  शैलेश नवाल व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, एसडीओ उदयसिंह राजपूत, तहसीलदार व  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, मंडळ अधिकारी  ढोक  यांची यावेळी उपस्थिती होती. कोरोना प्रादुर्भाव थांबविण्याकरिता वेळोवेळी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. याबाबत अनेक नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व जिल्हा प्रशासनाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. या संकल्पनेला राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ अमरावती या विभागातील बँड पथकाने देशभक्तीपर धून वाजवून स्वागत आणि आभार व्यक्त केले. पोलीस निरीक्षक  प्रफुल्ल वाघमारे यांच्या मार्गदर्शनात राज्य राखीव पोलीस बल गट  ९ अमरावती  येथील बँड पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले. यावेळी जिल्हा शोध व बचाव पथकातील कर्मचाऱ्यांसह हेमंत सरकटे, अमित बुले, भूषण वैद्य, उदय मोरे, देवानंद भुजाडे, अर्जुन सुंदरडे, आकाश निमकर, बँड पथकातील कर्मचारी तसेच पोलीस निरीक्षक एम. बी. नेवारे, ए.के. खडसे, एम.सी. हिवराळे, ए.एस.जाधव, के.एस. घाटोळे, पी.एस. नवाळे, एम.आर. ठाकरे, कौशल मोरघडे यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले.

संर्सगाचे काळात अमरावतीकरांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करत शिस्त दाखविली आहे. यासाठी नागरिकांप्रती आभार व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची संकल्पना आहे. संसर्ग नियंत्रणात राहिल्यास आमचेही कर्मचारी सुरक्षित राहतात. - हर्ष पोद्दार, कमाडंट, एसआरपीएफ

त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहनकोरोना काळात, मास्क वापरणे, फिजिकल डिस्टंसिंगचा वापर, सॅनिटायझरने हात वारंवार धुणे, पात्र नागरिकांनी कोरोनाची लस घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी नागरिकांमध्ये जागृतीदेखील करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची ही संकल्पना आहे. कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे महत्त्वाचे असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या