शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ठाणेदार चोरमलेंची 'आॅन द स्पॉट अ‍ॅक्शन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 22:10 IST

एक महिला घाबरलेल्या व भयभीत अवस्थेत ठाणेदारांपुढे येते आणि पतीने मारहाण करून घरातून हाकलून लावल्याचे सांगते. दीड महिन्यांचा चिमुकला घरी आहे, पती त्याचेही बरेवाईट करेल, असे सांगते. ठाणेदार आसाराम चोरमले यांनी त्वरेने हाती वायरलेस वॉकीटॉकी घेऊन त्या महिलेच्या पतीला ताब्यात घेण्याचे फर्मान पोलिसांना सोडले.

ठळक मुद्देतक्रारींची दखल : प्रकरणांचा तातडीने निपटारा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एक महिला घाबरलेल्या व भयभीत अवस्थेत ठाणेदारांपुढे येते आणि पतीने मारहाण करून घरातून हाकलून लावल्याचे सांगते. दीड महिन्यांचा चिमुकला घरी आहे, पती त्याचेही बरेवाईट करेल, असे सांगते. ठाणेदार आसाराम चोरमले यांनी त्वरेने हाती वायरलेस वॉकीटॉकी घेऊन त्या महिलेच्या पतीला ताब्यात घेण्याचे फर्मान पोलिसांना सोडले.नागरिकांच्या सरंक्षणाची जबाबदारी पोलिसांच्या कर्तव्याचाच असून तक्रारीवर तत्काळ अ‍ॅक्शन घेणे, हा सुध्दा कर्तव्याचाच भाग आहे. मात्र, काही पोलीस यंत्रणा तक्रारीची दखल तत्काळ घेणेच विसरले आहेत. मात्र, ठाणेदार चोरमलेंची कर्तव्य बजावण्याची पद्धत वेगळी आहे. शनिवारी दुपारी २ वाजता एक तरुणी ठाणेदाराकडे येते आणि एका एसआरपीएफ जवानाने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचे कथन करते. आता तो दुसऱ्या तरुणीशी सांक्षगंध करीत असल्याची तक्रार ती तरुणी करते. हा प्रकार ऐकताच ठाणेदार चोरमले यांनी एका पोलिसाला त्या जवानाच्या शोधात पाठविले. काही वेळातच तो कर्मचारी त्या जवानाला ठाण्यात हजर करतो. हे प्रकरण निपटत नाही, तर भयभीत अवस्थेत एक महिला ठाण्यात येते. पती दारू पिऊन मारहाण करीत आहे, त्याने घरातून हाकलून लावले, माझा दीड महिन्याचा बाळ पाळण्यातच आहे. पती त्याचेही बरेवाईट करेल, अशी ती सांगते. त्यावर तत्काळ अ‍ॅक्शन घेत चोरमले गस्तीवरील पोलिसांना सुचना देऊन त्या महिलेच्या पतीस ठाण्यात आणण्यास सांगतात. काही वेळातच पोलीस तिच्या पतीला घेऊन ठाण्यात आणतात. त्यानंतर पुढील कारवाई सुरू केली जाते. अशा प्रकारची तडकाफडकीची कारवाई करण्याचे कर्तव्यदक्ष ठाणेदार चोरमले असल्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळत आहे.

टॅग्स :Policeपोलिस