समस्यांवर केली चर्चा : ११० चिमुकल्यांशी साधला संवाद अमरावती : सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या शहरातील प्रसिध्द कलोती कुटुंबाने ‘चॅरिटी आॅफ मिशनरी’ या इर्विन चौकातील अनाथाश्रमातील मुलांना मंगळवारी वस्त्र वाटप केले. यावेळी कलोती कुटुंबियांनी अनाथाश्रमातील ११० चिमुकल्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यात. यावेळी कलोती कुटुंबातील उर्मिला रमेश कलोती, राहुल रमेश कलोती, पूजा राहुल कलोती आणि शुभांगी मुकुल कलोती यांची उपस्थिती होती. कलोती कुटुंबातील सदस्यांनी या अनाथाश्रमातील वॉर्डन व इतर कर्मचाऱ्यांसोबत देखील आपुलकीने चर्चा केली. अनाथाश्रमाचे कामकाज करताना येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना यासंबंधी देखील यावेळी विस्तृत चर्चा करण्यात आली. येथील समस्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी कलोती कुटूंबाने दिले. कलोती कुटूंब हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहे. यावेळी अमित तांडे, शशांक नागरे, नितीन व्यास यासह अनेक गणमान्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कलोती कुटुंबाद्वारे अनाथाश्रमात वस्त्रवाटप
By admin | Updated: March 3, 2016 00:33 IST