जिंंदा शहीद बिट्टा : टायटन्स पब्लिक स्कूलच्या स्नेहसंमेलनात मार्गदर्शनबडनेरा : राष्ट्रनिर्मितसाठी देशसेवेचा भाव असणे आवश्यक आहे. मी लहानपणापासून शहीद भगतसिंग, राजगुरू यांच्या त्यागाच्या, देशप्रेमाच्या गोष्टी ऐकल्या आहेत. त्यामुळे माझ्या अंगात देशप्रेमाचे बीज रूजले आहे. नोटाबंदीचा निर्णय हा योग्य निर्णय होेता. यामुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे, असे प्रतिपादन अ.भा. आतंकवादी विरोधी मोर्चाचे अध्यक्ष जिंदा शहीद मनिंदरजीतसिंग बिट्टा यांनी केले.विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित टायटन्स पब्लिक स्कूल येथे आयोजित स्नेहसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य वनसंरक्षक संजय गौड, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची उपस्थिती होेती. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत. शाळेच्या प्राचार्य श्वेता पैठणकर यांनी शाळेचा प्रगती अहवाल वाचून दाखविला. यावेळी बिट्टा यांच्या जीवनकार्यावर आधारित जिवनपट प्रस्तुत करण्यात आला. संचालन व आभार प्रदर्शन प्राचार्य श्वेता पैठणकर यांनी केले. कार्यक्रमासाठी विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे, उपाध्यक्ष विनय गोहाड, कोषाध्यक्ष पंकज देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी, कार्यकारी सदस्य उदय देशमुख, हेैमंत देशमुख, नितीन हिवसे, गजानन काळे, रागिनी देशमुख, वैशाली धांडे, माधुरी गोेहाड, माधवी देशमुख, पूनम चौधरी आदींनी प्रयत्न केले.अन् गहिवरले बिट्टाकार्यक्रमात आपले अनुभव कथन करताना जिंदा शहीद बिट्टा यांना गहिवर आला. त्यांचा गळा दाटून आला. विद्यार्थ्यांच्या अंगावर तर अक्षरश: रोमांच उभे राहिले होते.
नोटाबंदीने मोडले दहशतवाद्यांचे कंबरडे
By admin | Updated: March 2, 2017 00:08 IST