शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

मेळघाटात वाघीणची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 01:35 IST

या वाघीणीला बंदिस्त करून मेळघाट बाहेर सोडण्यात यावे अशी मागणी प्रकर्षाने समोर आली आहे. मेळघाटसाठी वाघ किंवा अन्य वन्य प्राण्यांचे हल्ले नवे नाहीत. मात्र दीड महिन्याच्या कालावधीत ई-१ वाघीणीने धुमाकुळ घातल्याने वनविभाग व आदीवासींमध्ये संघर्ष पेटू लागला आहे.

ठळक मुद्देसहा हल्ले : शेळ्या, गायी, वासरे फस्त, महिला व मुलीवर हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : मेळघाटातील धारणी तालुक्यात सद्या ‘ई’ वाघीणीने दहशत माजविली आहे. या वाघीनीने दिड महिन्याच्या कालावधीत शेळ्या, गायी, बैल, म्हैस फस्त केली आहे. महिला व मुलीवर हल्ला चढविला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी जंगलातून ही नरभक्षी वाघीण तालुक्यातील डोलार जंगलात सोडण्यात आली. तेव्हापासून आसपासच्या तीस गावांमध्ये ही वाघीण धुमाकूळ घालत आहे. या वाघीणीने मानव प्राण्यांसह पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याने आदिवासी भयभित झाले आहेत.या वाघीणीला बंदिस्त करून मेळघाट बाहेर सोडण्यात यावे अशी मागणी प्रकर्षाने समोर आली आहे. मेळघाटसाठी वाघ किंवा अन्य वन्य प्राण्यांचे हल्ले नवे नाहीत. मात्र दीड महिन्याच्या कालावधीत ई-१ वाघीणीने धुमाकुळ घातल्याने वनविभाग व आदीवासींमध्ये संघर्ष पेटू लागला आहे. आधीच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या पुनर्वसनावरून आदिवासी व वनविभागामध्ये तेढ झाली असतांना ई-१ वाघीणीच्या वाढत्या धुमाकुळाने आदिवासींमध्ये असंतोष वाढीस लागला आहे.३ जुलै रोजी केकदाखेडा येथील सात वर्षीय मुलीवर या वाघीणीने हल्ला केला. ६ जुलै रोजी कावडाझरी येथे एक म्हैस ठार करूण रखवालदारावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. १२ जुलै रोजी तंबोली येथील महिलेवर हल्ला करून दिला गंभिर जखमी केले. १९ जुलै रोजी तीन शेळ्या फस्त केल्या. २३ आॅगस्ट रोजी धोदरा गावात ४ शेळ्या फस्त केल्या तर तीन जखमी केल्या. २६ आॅगस्ट रोजी बीबामल गावाच्या परिसरात दोन गायीसह दोन वासरे फस्त केली तथा तीन बैलांना जखमी केले. सदर वाघीण बिबामल गावाच्या आसपास असून ती केव्हाही मानवावर हल्ला करण्याची भिती आहे. त्यामुळे त्या वाघीणीचा बंदोबस्त करावा तिला मेळघाट वन्यक्षेत्राबाहेर सोडण्यात यावे अशी मागणी आदीवासी बांधवांनी केली आहे. यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.