अमरावती : मसानगंज परिसरातील महापालिकेच्या शाळा क्रमांक २ जवळील एका टायर रिमोल्ड गोदामाला बुधवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. सदर गोदाम रामकिशन फुलचम अहीरवाल यांच्या मालकीचे आहे. आगीत रिमोल्ड टायर जळून खाक झाले. ही आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अग्निशमनच्या तीन बंबानी आगीवर नियंत्रण मिळविले. जुन्या टायरला रिमोल्डींगचे काम गोदामात केले जात होते. आगीने क्षणात रौद्ररुप धारण केले. अग्निशमनचे जवान घटनास्थळी पोहोचले. गोदामाच्या चारही बाजूंनी पाण्याचा मारा सुरू केला. तब्बल दोन तासांनंतर आग नियंत्रणात आली. तोपर्यंत शेकडो टायर आगीत सापडले होते. अग्निशमनचे फायरमन अजय पंधरे, उप्रकेंद्रप्रमुख सैय्यद अनवर, चालक आसिफ खान, अभिषेक निंबोरकर, फायरमन हर्षद दहातोड़े, मोहसीन इकबाल, मोहम्मद नासीर, गौरव कडू यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
टायर गोदामाला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:24 IST