शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाच्या मृत्यूवरून ग्रामीण रुग्णालयात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:24 IST

स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णाच्या नातेवाइकांच्या कानाखाली डॉक्टरांनी लावली व संबंधित रुग्णाला अमरावती येथे रेफर केले. तो रस्त्यातच दगावला. येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याच्या आरोपावरून ग्रामस्थांनी तेथे गर्दी केली. ही गर्दी पांगविण्यासाठी तब्बल चार तास पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्त : नागरिकांचा घेराव, मृत्यूस कारणीभूत डॉ. सालनकरच्या बदलीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णाच्या नातेवाइकांच्या कानाखाली डॉक्टरांनी लावली व संबंधित रुग्णाला अमरावती येथे रेफर केले. तो रस्त्यातच दगावला. येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याच्या आरोपावरून ग्रामस्थांनी तेथे गर्दी केली. ही गर्दी पांगविण्यासाठी तब्बल चार तास पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.तालुक्यातील ढाकूलगाव येथील नरेंद्र दिवाकर बाभूळकर (४१) याला उष्माघातामुळे ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी रात्री ११ वाजता दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याच्या नातेवाइकाने आरोग्य सेविकेला त्रास दिल्याचे गाºहाणे पुढे येताच तेथे कार्यरत डॉ. आशिष सालनकर यांनी नातेवाइकाच्या कानाखाली लगावली. यादरम्यान रुगणाची प्रकृती गंभीर झाल्याने रात्री १ वाजता अमरावतीला हलवावे लागले. मात्र, रस्त्यातच नरेंद्रचा मृत्यू झाला. यादरम्यान डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाइकास मारहाण केल्याचे वृत्त गावात पोहोचताच ग्रामस्थांनी रुग्णालयात गर्दी केली.याप्रकरणी डॉ. आशिष सालनकर यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. दत्तापूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मंगरूळ दस्तगिर, तळेगाव दशासर, कुºहा पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण केले. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्यांना पहाटे पाचारण करण्यात आले. तब्बल चार तास ग्रामीण रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. चांदूर रेल्वेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश शिंगटे यांनी घटनास्थळी भेट दिली.याप्रकरणी परस्परविरोधी कोणीही पोलिसांत तक्रार दिली नव्हती. त्यामुळे १२ वाजता लावलेला पोलीस बंदोबस्त हटविण्यात आला. मृत नरेंद्र बाभूळकर याच्या पार्थिवाचे शवविच्छेदन अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवारी करण्यात आले. सायंकाळच्या सुमारास ढाकुलगाव येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नरेंद्र बाभूळकर याच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आहे.नरेंद्र बाभूळकर यांच्यावर उपचार सुरू असताना नातेवाइकाने दारूच्या नशेत आरोग्य सेविकेला त्रास दिला. उपचारादरम्यान नातेवाइकांनी डॉक्टरांना त्रास देणे, शिवीगाळ करणे कितपत योग्य आहे?- डॉ. आशिष सालनकरग्रामीण रुग्णालयडॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाइकांना मारणे योग्य नाही. डॉ. आशिष सालनकरमुळे नरेंद्रचा जीव गेला. सीसीटीव्ही तपासल्यास दोषी कोण, हे लक्षात येईल. येथे राजकारण करणाऱ्या सालनकरची त्वरित बदली करण्यात यावी.- विजय कांडलकरसरपंच, ढाकुलगाव

टॅग्स :hospitalहॉस्पिटलDeathमृत्यू