शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

दहा फटाकाविक्रेत्यांवर फौजदारी गुन्हा

By admin | Updated: November 1, 2016 00:14 IST

नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणी विनापरवाना व असुरक्षितरित्या फटाकाविक्री करणाऱ्या तब्बल दहा फटाका विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

सीपींच्या आदेशाने कारवाई : वर्दळीच्या ठिकाणी फटाकाविक्री भोवलीअमरावती : नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणी विनापरवाना व असुरक्षितरित्या फटाकाविक्री करणाऱ्या तब्बल दहा फटाका विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फटाका व्यवसायिकांवर शनिवारी व रविवारी या दोन दिवसांत ही कारवाई करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक ठिकाणी फटाकाविक्री व साठवणूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपायुक्तांनी आदेश पारित करून फटाका व्यवसायिकांना सूचना दिल्या होत्या. तरी सुुद्धा आदेशांचे उल्लंघन करीत शहरातील काही ठिकाणी फटाका विक्रेत्यांनी सार्वजनिक रस्त्यावर फटाका दुकाने थाटून विक्री सुरूच ठेवली होती. शनिवारी बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धमाननगरात पोलीस श्रीराम आमले यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना एक महिला मौलाना आझाद मार्केटजवळ विनापरवाना फटाकाविक्री करताना आढळल्याने त्यांनी महिलेविरूद्ध कलम २८६, १८८ सहकलम ५ स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ नुसार गुन्हा नोंदविला. गाडगेनगर पोलिसांनी राम मेघे कॉम्प्लेक्ससमोरील प्रशांत युवराज हंबर्डे, विलासनगरातील गौरव किशोर मातोली, नवसारीतील सोनू कैलास साहू, हर्षराज कॉलनीतील शेषराव लक्ष्मण गजभिये या फटाकाविक्रेत्यांवर कारवाई केली. वलगाव ठाण्याच्या हद्दीत पंकज पंजाब शिरभाते, शुभम दीपक बिजवे (२०,रा. आठवडी बाजार, पूर्णानगर) व ईमरान अली साबीर अली (२४,रा. साऊर) हे दोघे, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इतवारा बाजारात अब्दुल हारून ऊर्फ अमिन अब्दूल सत्तार (५०,रा. रतनगंज) व बालाजी मंदिर परिसरात एक महिला विना परवाना फटाकाविक्री करताना आढळून आले. यासर्व फटाका विक्रेत्यांनी पोलीस उपायुक्तांच्या आदेशाचे व कलम १४४ चे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी फटाकाविक्री व साठवणुकीस बंदी घालण्यात आली आहे. मात्र, काही फटाका विक्रेते वर्दळीच्या ठिकाणी फटाका विक्री करताना आढळून आल्याने त्यांच्यावर कलम १४४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.