आॅनलाईन लोकमतअमरावती : बोंड अळीचा पुढील हंगामात धोका कमी व्हावा, यासाठी जानेवारीनंतर कपाशीची फरदड नकोच, असा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला होता. तरीही शेतकºयांनी मोहापोटी फरदडीसाठी कपाशी शेतात उभी ठेवल्याने ही पुढील हंगामासाठी धोक्याची घंटा आहे.जानेवारीनंतर कापूस शेतात राहिल्यास गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र पूर्ण होऊन पुढील हंगामात प्रादुर्भाव कायम राहील. यामुळे शेतकºयांनी फरदड घेऊ नये, अशा सूचना राज्याचे कृषी आयुक्तांनी शेतकºयांना दिल्या आहेत. यंदा कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने हमीपेक्षा हजार रुपयांहून अधिक भाव शेतकºयांना मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनचे नुकसान सोसलेल्या शेतकºयांना फरदडीचा मोह आवरता घेता आलेला नाही. वास्तविकता या कापसाची प्रतवारी खराब असल्याने भाव कमी आहेत. मात्र, शेतकरी अडचणीत असल्यानेच फरदड काढून टाकायला धजावले नाहीत. त्याचे दृश्य परिणाम पुढील हंगामातील कपाशी पिकावर दिसतील, अशी भीती व्यक्त होत आहे.बोंडअळीच्या नियंत्रणासाठी हे आवश्यकडिसेंबरनंतर खाद्य उपलब्ध नसल्यास अळी सुप्तावस्थेत जाते; मात्र फरदड असल्यास अळीचे जीवनचक्र पुन्हा सुरू होते. हंगाम संपल्यावर शेतात शेळ्या, मेंढ्या चराईसाठी सोडाव्यात, कपाशीवर किडी सुप्त रूपात राहत असल्याने पºहाटीची गंजी शेतात ठेवू नये. काडी कचºयासह पºहाटी नष्ट कराव्यात. पीक काढणीनंतर खोल नांगरणी केल्यास जमिनीवरील किडीचे कोष नष्ट होतात.जिनिंंगमध्येही लावा कामगंध सापळेगुलाबी बोंडअळी कापसासोबत जिनिंगमध्ये पोहोचली असल्याने तिच्या नियंत्रणासाठी सर्व जिनिंगमध्ये १२ ते १५ कामगंध सापळे (फेरोमेन टॅप्स) लावावे, अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. या सापळ्यामध्ये अळीचे नर पतंग जमा होऊन पुढील पिकासाठी अळींना अटकाव करता येणार आहे.
शेतकऱ्यांना टळेना फरदडचा मोह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:48 IST
आॅनलाईन लोकमतअमरावती : बोंड अळीचा पुढील हंगामात धोका कमी व्हावा, यासाठी जानेवारीनंतर कपाशीची फरदड नकोच, असा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला होता. तरीही शेतकºयांनी मोहापोटी फरदडीसाठी कपाशी शेतात उभी ठेवल्याने ही पुढील हंगामासाठी धोक्याची घंटा आहे.जानेवारीनंतर कापूस शेतात राहिल्यास गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र पूर्ण होऊन पुढील हंगामात प्रादुर्भाव कायम राहील. यामुळे शेतकºयांनी ...
शेतकऱ्यांना टळेना फरदडचा मोह
ठळक मुद्देबोंडअळीचे संकट वाढले : पुढील हंगामासाठी धोक्याची घंटा