शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

'आई-बाबांना सांगा, प्लास्टिक बॅग वापरू नका'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 22:19 IST

आई-बाबांना सांगा, यापुढे प्लास्टिकची कॅरीबॅग मुळीच वापरू नका. त्यांनी ती वापरलीच, तर तुम्ही त्यांना ती वापरू देऊ नका, असे आवाहन महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना केले नि विद्यार्थ्यांनीही बुलंद आवाजात तसे अभिवचन आयुक्तांना दिले.

ठळक मुद्देमहापालिका आयुक्त : 'संस्काराचे मोती' स्पर्धेचे ‘पोदार इंटरनशॅनल स्कूल’मध्ये शानदार उद्घाटन
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: आई-बाबांना सांगा, यापुढे प्लास्टिकची कॅरीबॅग मुळीच वापरू नका. त्यांनी ती वापरलीच, तर तुम्ही त्यांना ती वापरू देऊ नका, असे आवाहन महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना केले नि विद्यार्थ्यांनीही बुलंद आवाजात तसे अभिवचन आयुक्तांना दिले.वाचनसंस्कृतीतून बालमनावर संस्कार बिंबविणाऱ्या 'संस्कारांचे मोती' या 'लोकमत'च्या बहुप्रतीक्षित उपक्रमाचे शानदार उद्घाटन सोमवारी येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात पार पडले. त्यावेळी अध्यक्षस्थानाहून बोलताना निपाणे यांनी विद्यार्थ्यांकडून पर्यावरण जपण्याचे हे वचन घेतले. वैशिष्ट्य असे की, 'लोकमत'चा हा उपक्रम यंदा पर्यावरण या विषयाला समर्पित आहे.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती जयंत देशमुख यांनीही 'ग्लोबल वॉर्मिंग'चा धोका विद्यार्थ्यांपुढे सोप्या शब्दांत विशद करून, पर्यावरण हा त्यावर कसा रामबाण उपाय ठरला आहे, याबाबतचे प्रभावी मार्गदर्शन केले. झाडे लावण्यासाठीची प्रेरणा विद्यार्थ्यांना त्यांच्या सुबोध मार्गदर्शनातून प्राप्त झाली.पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीर महाजन यांनी अमोघ वाणीतून विद्यार्थ्यांमध्ये चेतना जागविली. 'संस्कारांचे मोती' या उपक्रमाचे मनापासून कौतुक करताना 'लोकमत'च्या माध्यमातून पोदार इंटरनॅशनल स्कूलचे दोन विद्यार्थी 'हवाई सफरी'चे मानकरी ठरले आणि देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील तसेच लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याशी भेटण्याची संधी त्यांना प्राप्त होऊ शकली, असे गौरोद्गार त्यांनी काढले. 'लोकमत'चे संपादकीय प्रमुख गणेश देशमुख यांनी 'संस्कारांचे मोती' या उपक्रमाचे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्व विशद केले. 'लोकमत'चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे यावेळी मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत शिक्षिका रोशनी दर्जी यांनी सुरेख गीत सादर केले. शिक्षिका नयना दापूरकर यांनी सरस्वती वंदना सादर केली. संचालन शिक्षिका वृषाली भगतानी यांनी, तर आभार 'लोकमत'च्या वितरण विभागाचे सहायक व्यवस्थापक रवि खांडे यांनी व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून सोहळ्याची सांगता करण्यात आली.'संस्कारांचे मोती' या स्पर्धेचे उद्घाटन करताना महापालिका आयुक्त संजय निपाणे, जि.प. शिक्षण सभापती जयंत देशमुख, प्राचार्य सुधीर महाजन, 'लोकमत'चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे आणि संपादकीय प्रमुख गणेश देशमुख. (छायाचित्र : मनीष तसरे)