शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सांगा कसे करावे लसीकरण? हाती मोबाईल नाही, असला तर नेटवर्क नाही.. ऑनलाईन नोंदणी करायचे कळत नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 18:55 IST

Coronavirus in Amravati शासनाने कोरोना संसर्ग रोखण्याकरिता लसीकरणावर भर दिला असला तरी त्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक केले. यामुळे ग्रामीण भागात लसीकरणाला खीळ बसली आहे. त्याऐवजी सुटसुटीत, समजणारी सुविधा हवी, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागात लसीकरणाला ऑनलाइनचा खोडाअनेक जण त्रस्त, सुटसुटीत, समजणारी सुविधा हवी

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शासनाने कोरोना संसर्ग रोखण्याकरिता लसीकरणावर भर दिला असला तरी त्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक केले. यामुळे ग्रामीण भागात लसीकरणाला खीळ बसली आहे. त्याऐवजी सुटसुटीत, समजणारी सुविधा हवी, अशी मागणी होत आहे.लसीकरण प्रक्रिया राबविताना केंद्र व राज्य सरकारने नागरिकांना ऑनलाइन नोंदणी अनिवार्य केली आहे. ही प्रक्रिया ग्रामीण भागात विविध समस्यांमुळे पूर्ण होत नाही. जिल्ह्यात १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी लसीकरण सुरू झाले. कोरोनाचा दुसऱ्या लाटेत शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात शिरकाव वाढला. त्यामुळे ग्रामीण भागातही आता लसीकरणाकडे नागरिकांचा ओढा वाढतांना दिसत आहे. ग्रामीण भागात अनेक शेतकरी, शेतमजुरांकडे मोबाईल नाही, तर कुणाकडे मोबाईल असला तरी त्यांना ऑनलाईनची प्रक्रिया कळत नाही. परिणामी लसीकरणासाठी नोंदणी करणे ग्रामीण भागात शक्य होत नाही.ग्रामीण भागासाठी लसीकरणाची प्रक्रिया सर्वसामान्यांना समजेल अशी करावी किंवा लसीकरण केंद्रावरच नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, मेळघाटात नेटवर्कची अडचण आहे. त्यामुळे दुर्गम गावात नोंदणी अशक्यच आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस