शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST

पोट भरणे कठीण असताना मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न फारच कठीण झाला आहे. बँन्ड पथक अथवा कलावंतांसाठी उन्हाळ्यातील लग्नसोहळे हाच तीन ते चार महिन्यांचा हंगाम असतो. एरव्ही आठ महिने मोलमजुरी करून उपजिविका भागविणे हा त्यांचा पंरपरागत शिरस्ता आहे. बँन्ड कलावंतांकडे रिक्षा चालविणे, सुरक्षा रक्षक, कंत्राटी स्वच्छता, मोलमजुरी करणे हे पर्यायी रोजगाराचे साधन आहेत.

ठळक मुद्देबँड कलावंतांची व्यथा : जिल्ह्यात पाच हजार बेरोजगारांवर उपासमार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनामुळे सार्वत्रिक लग्न सोहळे, मुंजे व इतर आनंदाचे कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे बॅन्ड पथक आणि कलावंतांना गत तीन महिन्यांपासून रोजगार नाही. अतिशय हलाखीचे जगणे. सकाळी कामावर गेल्याशिवाय सायंकाळी चूल पेटत नाही, अशी विदारक स्थिती बँन्ड कलावंत असलेल्या मातंग बांधवांची आहे. त्यामुळे आता आम्ही जगायचे कसे, असा सवाल जिल्ह्यातील सुमारे पाच हजार बँन्ड कलावंतांनी उपस्थित केला आहे. गत दोन दिवसांपूर्वी अमरावती दौऱ्यावर आलेले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बँन्ड कलावंतांनी समस्यांचे निवेदन दिले.पोट भरणे कठीण असताना मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न फारच कठीण झाला आहे. बँन्ड पथक अथवा कलावंतांसाठी उन्हाळ्यातील लग्नसोहळे हाच तीन ते चार महिन्यांचा हंगाम असतो. एरव्ही आठ महिने मोलमजुरी करून उपजिविका भागविणे हा त्यांचा पंरपरागत शिरस्ता आहे. बँन्ड कलावंतांकडे रिक्षा चालविणे, सुरक्षा रक्षक, कंत्राटी स्वच्छता, मोलमजुरी करणे हे पर्यायी रोजगाराचे साधन आहेत. मातंग समाजातील महिलादेखील कष्टकरी, श्रमजिवी म्हणून राबतानाचे चित्र आहे. गरिबी, हलाखीचे जगणे, श्रमातून मिळणाºया तुटपुंज्या रकमेवर उपजिविका हे बँन्ड कलावंत भागवितात. त्यामुळे बँन्ड कलावंतांच्या कुटंबीयातील नव्या पिढीने या पंरपरागत व्यवसायाकडे पाठ फिरवित शिक्षणाची कास धरल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सुमारे ५०० बँन्ड पार्टी असून, प्रति २० ते ३० हजार रुपयांत करार करून बँन्ड पथक वाजवितात. कोरोनाचा मुला-बाळांच्या शिक्षणावर प्रभाव नक्कीच होणार आहे.तीन बँड कलावंतांनी मृत्यूला कवटाळलेकोरोना महामारीच्या काळात बँन्ड कलावंतांना रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे उपासमारीने तीन बँड कलावंतांचा मृत्यू झाला. याबाबत पाच वेळा शासनाकडे निवेदन देण्यात आले. अद्यापही त्याची ना चौकशी, ना तपास करण्यात आला. शासनाच्या नोंदी मातंग समाजाचे बँड कलावंत हे कलावंत नाही, अशी भूमिका असल्याचा आरोप श्रीराम बँडचे संचालक महेंद्र सरकटे यांनी केला आहे. त्यामुळे मृत्युमूखी पडलेल्या तीन बँन्ड कलावंतांना न्याय मिळावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.बँन्ड कलावंत हा कोणत्याही संगीत विद्यालयात जात नाही. तो परंपरागत कलावंत आहे. तीन ते चार महिनेच बँन्ड क लावंतांना सुगीचे दिवस असतात. त्यामुळे शासनाने मानधन देऊन त्यांच्यात जगण्याची उमेद निर्माण करावी.-गणेशदास गायकवाड, संचालक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न