शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

'लाडकी बहीण' समितीत तालुका सचिव पदासाठी तहसीलदारांचे हात वर; कामाचा व्याप जास्त

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 7, 2024 22:45 IST

‘महिला व बाल विकास’कडे बोट, संघटनेचे शासनाला निवेदन

गजानन मोहोड, अमरावती: ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय समितीत सचिवपदाची जबाबदारी संबंधित तहसीलदार यांच्याकडे सोपविण्यात आली. कामाची व्यस्तता जास्त असल्याने ही जबाबदारी महिला व बालकल्याण विभागाकडेच देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेद्वारा करण्यात आली. याबाबत राज्य कार्यकारिणीद्वारा शासनाला निवेदन देण्यात आले.

याबाबत संघटनेच्या राज्यस्तर बैठकीत याबाबत चर्चा करून ठराव घेण्यात आला. या योजनेसाठी आवश्यक दाखले व अनुषंगिक कागदपत्रे, हे तहसीलदार व महसूल विभागाद्वारा वेळेत देण्याबाबत दक्षता घेण्यात येईल, मात्र तालुका सचिव हे पद संबंधित विभागाकडे देण्यात यावे, अन्यथा काम नाकारल्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे संघटनेद्वारा स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत  जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना ८ तारखेला जिल्हा कार्यकारिणीद्वारा निवेदन देण्यात येणार असल्याचे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांनी सांगितले.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी ३ जुलै रोजी महिला व बालकल्याण विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या विभागाची योजना असताना तालुका समितीत महिला व बाल विकास अधिकारी यांना सदस्य सचिव नियुक्त न करता योजनेच्या अंमलबजावणीसाठी तहसीलदार यांना नियुक्त करण्यात आले आहे. यावरून आता या दोन विभागात जुंपल्याचे दिसून येते.

महिला व बालकल्याण विभागाची ही योजना असल्याने अंंमलबजावणीसाठी समितीत त्याच विभागाचे सचिव आवश्यक आहे. तहसीलदार यांच्याकडे आधीच खूप कामे असताना त्यांच्याकडे पूर्ण जबाबदारी सोपविणे योग्य नाही, महसूल विभागाद्वारा आवश्यक दाखले वेळेत देऊ.-सुरेश बगळे, राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना.

या कामांमध्ये व्यस्त आहेत तहसीलदार

महसूल विभागात कामाचा व्याप, मतदार यादीचा संक्षिप्त कार्यक्रम, विधानसभा निवडणूक पूर्वतयारी, नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे, बाधित शेतकऱ्यांची ई-केवायसी, संजय गांधी निराधार योजना (डीबीटी), आधार प्रमाणीकरण, शिधापत्रिका ऑनलाइन, के-वायसी करणे, ग्रा.पं. निवडणूक कार्यक्रम, महसूल वसुली, ७/१२ संगणकीकरण, ई-पीक पाहणी, ई-चावडी यासह अन्य योजनांची जबाबदारी व क्षेत्रीय मनुष्यबळ अपुरे असल्याचे संघटनेद्वारा निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीChief Ministerमुख्यमंत्री