टाकरखेडा संभू : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ‘तहसील आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जात असून, भातकुली तालुक्यात मंगळवारी सहा जुलैपासून या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ताालुक्यात २२ ऑगस्टपर्यंत प्रत्येक गावात शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेता येणार असल्याची माहिती तहसीलदार नीता लबडे यांनी दिली.
कोरोनाच्या च्या पार्श्वभूमीवर कार्यालयांमध्ये गर्दी होऊ नये, याकरिता जिल्ह्यात ‘तहसील आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नागरिकांना प्रत्येक योजना त्यांच्याच गावात उपलब्ध होणार आहे. याकरिता गावोगावी प्रत्येक विभागाचे शिबिरे आयोजित करून नागरिकांना विविध १३ योजनांचा लाभ दिला जात आहे. गणोजा देवी येथे ८ जुलै, दाढी येथे ९ जुलै, बहादरपूर येथे १० जुलै, गणोरी येथे ११ जुलै व कुमागड येथे १२ जुलैला शिबिर होत आहे.
-------------महसूल मंडळांनिहाय शिबिर
१३ ते २१ जुलै दरम्यान निंभा, २२ ते २८ जुलै दरम्यान आष्टी, २९ जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान खोलापूर, ७ ते १५ ऑगस्ट दरम्यान आसरा, १६ ते २२ ऑगस्ट दरम्यान पूर्णानगर महसूल मंडळातील गावांमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
बॉक्स
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयांमध्ये गर्दी टाळण्यासाठी भातकुली तालुक्यातील ४९ गावांमध्ये गावनिहाय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक योजनांची माहिती व योजनांचा लाभ या शिबिरात अंतर्गत नागरिकांना दिली जाणार आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.
- नीता लबडे, तहसीलदार, भातकुली