शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

यूजीसी नेट ऑनलाइन परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचण; एकतास उशिरा सुरू झाली परीक्षा

By उज्वल भालेकर | Updated: December 13, 2023 20:35 IST

बाहेरील जिल्ह्यातून तसेच ग्रामीण भागातून परिक्षेसाठी आलेल्या परिक्षार्थींच्या परतीच्या प्रवासाचे नियोजन बिघडल्याने यावेळी चांगलाच मनस्ताप व्यक्त करण्यात आला.

अमरावती : यूजीसी-राष्ट्रीय पात्रता चाचणी (यूजीसी-नेट) ऑनलाइन परीक्षा ६ डिसेंबरपासून सुरू आहेत. बुधवारी या दुसऱ्या शिफ़्ट दरम्यान आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल एक तास परीक्षा सुरू झाली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. बाहेरील जिल्ह्यातून तसेच ग्रामीण भागातून परिक्षेसाठी आलेल्या परिक्षार्थींच्या परतीच्या प्रवासाचे नियोजन बिघडल्याने यावेळी चांगलाच मनस्ताप व्यक्त करण्यात आला.सहायक प्राध्यापक तसेच ज्युनिअर फेलोशिप आणि सहायक प्राध्यापकांसाठी  यूजीसी-राष्ट्रीय पात्रता चाचणी (यूजीसी-नेट) परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी ही परीक्षा देतात. त्यानुसार ६ ते १४ डिसेंबर या कालावधीत ही ऑनलाइन पद्धतीने परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. एनटीए’च्या वेळापत्रकानुसार दररोज दोन सत्रांमध्ये विविध विषयांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.  परंतु या ऑनलाइन परीक्षेदरम्यान परीक्षार्थींना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १२ डिसेंबरला परीक्षा सुरू झाल्यानंतर दीडतासाने अचानक तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा बंद पडली होती. तर बुधवारी दुसऱ्या सत्रातील परीक्षा ही दुपारी ३ वाजता सुरू होणे अपेक्षित होती. परंतु तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा ४ वाजता सुरू झाली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता. परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या अर्धातासपूर्वीच प्रवेश बंद केला होता. पाच मिनिट उशीर झाला तरीही परीक्षार्थींना प्रवेश नाकारला जातो. त्यामुळेसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ते मार्डी रोडवर असलेल्या पीसी पॉईंट प्लॅनेट प्लाझा केंद्रावर  इतर जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील परीक्षार्थी हे एक तासापूर्वीच केंद्रावर पोहचले होते. परंतु परीक्षा उशीरा एक तास उशिरा सुरू झाल्याने ६ वाजता सुटणारी परीक्षा सायंकाळी ७ वाजता आटोपल्याने अनेक परीक्षार्थीच्या परतीच्या प्रवेशाचे नियोजन बिघडल्याने संताप व्यक्त करण्यात आला.सर्वच केंद्रावर अडचणतांत्रिक अडचणीमुळे देशभरातील सर्वच केंद्रावरील परीक्षा थांबल्या आहेत. परीक्षा सुरळीत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पीसी पॉईंट प्लॅनेट प्लाझा परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण झाल्यानंतर आयटी मॅनेजर विशाल काळे यांनी दिली.परीक्षा केंद्रावर पाच मिनिटं उशीर झाला तरी विद्यार्थांना प्रवेश नाकारला जातो. तर एक तास उशिरा परीक्षा सुरू झाली याला कोण जबाबदार आहे. उशिरा परीक्षा सुरू झाल्याने अनेक बाहेर गावावरुन आलेल्या विद्यार्थ्यांच्या परतीच्या प्रवासाचे नियोजन बिघडले आहे. त्यांना आता गावी परतण्यासाठी आवश्यक बस मिळेल की नाही याची चिंता आहे.सुबोध धुरंदर, परीक्षार्थी 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी