शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

कोविड रुग्णालयासाठी शिक्षक मदतनिधी उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:12 IST

अमरावती : कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता सामाजिक उत्तरदायित्व म्हणून ‘चला जीवन वाचवू या’ या संकल्पनेतून जिल्हा परिषद ...

अमरावती : कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता सामाजिक उत्तरदायित्व म्हणून ‘चला जीवन वाचवू या’ या संकल्पनेतून जिल्हा परिषद अंतर्गत सहा हजार शिक्षकांच्या मदतनिधीतून अद्ययावत कोविड रुग्णलय उभारले जाणार आहे. त्यानुसार शिक्षकांनी बैठकांचे सत्र आरंभले आहे.

गत आठवड्यात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील शिक्षकांनी एकजूट दाखवत तीन कोविड रुग्णालयांची निर्मिती केली. ही बाब अन्य जिल्ह्यांतील शिक्षकांच्या मनाला छेदून गेली. समाज माध्यमांवर ‘तेथील शिक्षक करू शकतात, मग येथील का नाही?’ हा मुद्दा काहींच्या काळजाला भिडला व यातून ‘चला जीवन वाचवू या’ ही संकल्पना पुढे आली. अमरावती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी या प्रेरणादायी उपक्रमात हिरिरीने सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या सामाजिक कार्यात मुख्याध्यापक संघही सहभागी होणार आहे. प्रथमत: शिक्षकांद्वारे आलेल्या या सामाजिक कार्यासाठी अधिकाऱ्यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सेवानिवृत्तांनी यात खारीचा वाटा राहण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोविड सेंटर उभारणी करीता शिक्षकांचे वेतन किंवा जि.प.कल्याण निधीमधून निधी घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

--------------------

मदतनिधीची ऐतिहासिक नोंद

प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांसह जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखविली तर निश्‍चितच ही रक्कम कोटींच्यावर जाणार आहे. यातून कोविड रुग्णालय निर्माण होताच प्रशासनाला हा निधी सुपूर्द करणार येणार आहे. मात्र, कोरोनाच्या निमित्ताने होणाऱ्या या सत्कार्याची ऐतिहासिक नोंद होईल, अशी ग्वाही प्राथिमक शिक्षक परिषदेेचे प्रसिद्ध प्रमुख राजेश सावरकर यांनी दिली आहे.

००००००००००००००००००

(ही बातमी स्वतंत्र आहे)

कोरोना प्रादुर्भावात प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला प्रारंभ

हरकतीच्या कालावधीमुळे ३१ मेपूर्वी बदल्यांबद्दल शिक्षकांत संभ्रम

अमरावती : ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची पूर्वतयारी सुरू केली आहे. यंदा शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणात काही बदल करण्यात आले आहेत. अवघड क्षेत्रातील शाळांचे निकष बदलण्यात आले आहेत. तसेच यंदा बदल्या पाच टप्प्यात होतील. करोनाच्या प्रादुर्भावाने भयावह स्वरूप धारण केले असतानाच बदली प्रक्रिया घडत आहे. मात्र, यासाठी ठरवून दिलेला हरकतींचा कालावधी पाहता ३१ मे पूर्वी बदल्या होणार का, की त्याला मुदतवाढ मिळणार याबद्दल शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. यंदा मात्र बदल्या होण्यासाठी शिक्षक संघटना आग्रही होत्या. त्यामुळे ग्रामविकास विभागाने गेल्या महिन्यात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या निकषात बदल करणारा आदेश जारी केला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बदल्यांची पूर्वतयारी सुरू केली आहे. अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

यापूर्वी अवघड क्षेत्रातील शाळांची निवड अधिकारी प्रत्यक्ष शाळेच्या जागेची पाहणी करत होते. परंतु आता त्यासाठी निकष ठरवले गेले आहेत. त्यानुसार पेसा, डोंगरी, २ हजार मि.मी. पर्यंत पडणारे पर्जन्यमान, राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून १० किमी आतमध्ये असणारी शाळा, 'इंटरनेट कनेक्टिव्हिटी' न मिळणाऱ्या शाळा, जंगलव्याप्त व हिंस्त्र प्राण्यांचा उपद्रव असणारी गावे आदी निकष देण्यात आले आहेत. यापैकी कोणतेही तीन निकष पूर्ण करणारी शाळा अवघड क्षेत्रातील गणली जाईल. जिल्ह्यात यापूर्वी ३६८ शाळा अवघड क्षेत्रात होत्या, आता नवीन निकषामुळे ही संख्या कमी होणार आहे.

------------------

बदल्या पाच टप्प्यांत होणार

पहिल्या टप्प्यात रिक्त जागांचे समाणीकरण, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात विशेष १ व २ संवर्गातील शिक्षकांच्या चौथ्या टप्प्यात बदली अधिकारप्राप्त शिक्षक (अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये तीन वर्षे पूर्ण) व पाचव्या टप्प्यात बदली प्राप्त (सेवाज्येष्ठता १० वर्षे व एकाच शाळेत ५ वर्षे) या क्रमाने बदल्या होतील.

सुरुवातीला प्रशासकीय नंतर विनंती बदल्या होतील. हरकतींसाठी २४ दिवसांचा कालावधी ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया मार्चमध्ये सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र प्रत्यक्षात बदल्यांमधील निकषात बदल करण्याचे धोरण ७ एप्रिलला जाहीर केले. त्यानुसार बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या जाहीर करणे, त्यासाठी ५ दिवसांत शिक्षणाधिकाऱ्यांकडे हरकती नोंदवणे, शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यावर ७ दिवसांत निर्णय घेणे. त्यानंतर ५ दिवसांत 'सीईओ'कडे अपील करणे, 'सीईओ' यांनी ७ दिवसांत निर्णय घेणे, असा एकूण २४ दिवसांचा कालावधी दिलेला आहे. या कालावधीमुळेच बदल्यांची प्रक्रिया ३१ मेपूर्वी पूर्ण होणार का, की त्याला मुदतवाढ मिळणार, याबद्दल शिक्षकांमध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे. याशिवाय यापूर्वी शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने राज्य पातळीवरूनच केल्या जात होत्या. यंदा जिल्हा पातळीवरच ऑनलाईन पद्धतीने केल्या जाणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाला संचालनालयाने संगणक प्रणालीचा आयडी क्रमांक दिला आहे.

-------------------

पदाधिकारी बदली प्रक्रियेपासून दूर

आतापर्यंत प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावे, त्यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्याचे समुपदेशन करुन बदल्या कराव्यात, असे ग्रामविकास विभागाच्या पूर्वीच्या आदेशात नमूद केले होते. यंदाच्या बदल्यांच्या धोरणात मात्र याचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे बदल्यांच्या प्रक्रियेपासून यंदा पदाधिकाऱ्यांना दूर राहावे लागणार आहे.

-------------------