शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

शिक्षकांना वरिष्ठ निवडश्रेणीचा लाभ मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 22:57 IST

शाळांमध्ये शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव पाठविण्याबाबत मुख्याध्यापक व संस्थाचालकांकडून विलंब होत होता.

ठळक मुद्देशिक्षण उपसंचालकांचा आदेश : शेखर भोयर यांनी केली होती मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शाळांमध्ये शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव पाठविण्याबाबत मुख्याध्यापक व संस्थाचालकांकडून विलंब होत होता. याला शिक्षण उपसंचालकांनी आवर घातला असून संबंधित कर्मचाºयांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव तत्काळ पाठवावे, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी विभागातील सर्व शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ मिळणार आहे.अनेक शाळांमध्ये शेकडो शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणी मिळण्यापासून वंचित होते. त्यांच्यावरील अन्याय दूर होण्यासाठी मुख्याध्यापक व संस्थाचालकांना याबाबत निर्देश द्यावे, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी दोन दिवसांपूर्वीच शिक्षण उपसंचालक सी.आर.राठोड यांना केली होती. या पत्राची गंभीर दखल घेत शिक्षण उपसंचालकांनी अमरावती विभागातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना आदेश दिले आहेत. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांना १२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ श्रेणी, तर २४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवड श्रेणी लागू होते. यासाठी विभागीय शिक्षण मंडळामार्फत शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले जाते. सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तसा प्रस्ताव प्रथम शिक्षणाधिकारी व नंतर लेखाधिकारी कार्यालयाकडे पाठवावा लागतो. प्रस्ताव मंजूर होऊन आल्यानंतर वरिष्ठ व निवड श्रेणीचे लाभ शिक्षकांना मिळतात. परंतु अनेक शाळांमध्ये अंतर्गत वाद असल्याकारणाने वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही मुख्याध्यापक व संस्थाचालकांकडून सदर प्रस्ताव पाठविला जात नाही. त्यामुळे त्यांना या श्रेणीचा लाभ मिळत नाही. त्यामुळे असे शिक्षक अटी व शर्थी पूर्ण करूनही वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ घेऊ शकत नाही अशा शिक्षकांवर अन्याय होत असल्याची बाबही शेखर भोयर यांनी शिक्षण उपसंचालकांच्या लक्षात आणून दिली. यावर शिक्षण उपसंचालकांनी मुख्याध्यापक व संस्था चालकांना सूचना द्याव्यात, असे आदेश प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.