शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

शिक्षिकेत्तर कर्मचाऱ्यांचा एल्गार

By admin | Updated: August 10, 2016 00:18 IST

शिक्षण विभागाच्या शिक्षकांसह अविभाज्य घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत.

मागण्या प्रलंबित : उपशिक्षणाधिकारी यांना निवदेनभंडारा : शिक्षण विभागाच्या शिक्षकांसह अविभाज्य घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याबाबत सोमवारला शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान भंडारा जिल्ह्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपशिक्षणाधिकारी (माध्य.) यांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये आकृतीबंधाबाबत नियुक्त केलेल्या समितीने सादर केलेला अहवाल मंजूर करून शिक्षकांच्या भरतीस परवानगी द्यावी, राज्य शासकीय कर्मचारी यांच्या प्रमाणे माध्यमिक शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १२ व २४ वर्षानंतर पहिला व दुसरा लाभ लागू करावा, राज्यातील शिक्षकेत्तरांच्या अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांना मान्यता देण्यात याव्या. शिक्षिकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीतील त्रुटी दूर कराव्या, १३ जुलै २०१६ च्या अल्पसंख्यांक शाळांबाबतच्या शासन निर्णयानुसार शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरत असल्यास त्यांचे समायोजन स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर ठिकाणी करावे, शिक्षकेत्तरांना सेवेत असताना शैक्षणिक पात्रता वाढविल्यास त्यास सर्व प्रकारच्या पदांवर वेतन संवर्गासह विनाअट संवर्ग बदलून मिळावा, माध्यमिक शाळामधील सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी प्रत्यक्ष होणारा खर्च तथा धुलाई भत्ता नियमित वेतनातून मिळावा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा लागू करावी यासह अन्य मागण्यांना घेऊन हे निवेदन देण्यात आले. भंडारा येथे उपशिक्षणाधिकारी भोंगाडे यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष सैनपाल वासनिक, राजेश तितीरमारे, संजय ब्राम्हणकर, श्रीकांत कावळे, ऋषीकेश डोंगरे, राजू निंबार्ते, जे.बी. बांते, बी.एस. निखारे, डी. एस. गजभिये, रतन वंजारी, गंगाधर भदाडे, एस.के. सेलोकर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)