शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात शिक्षकांची आठवड्यातून फक्त दोनदा हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 12:04 IST

मेळघाटमधील धारणी आणि चिखलदरा या दोन्ही पंचायत समित्यांमधील दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक आठवड्यातून फक्त दोन दिवस शाळेत हजर राहून शैक्षणिक कार्य करीत आहेत.

ठळक मुद्देअधिकारी मॅनेजशिक्षणाचा बट्ट्याबोळ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यातपाचवी ते आठवीमधील विद्यार्थ्यांना त्यांचे नावसुद्धा धड लिहिता येत नाही

पंकज लायदे।आॅनलाईन लोकमतअमरावती: मेळघाटमधील धारणी आणि चिखलदरा या दोन्ही पंचायत समित्यांमधील दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक दांडी मारण्यात पटाईत असून, आठवड्यातून फक्त दोन दिवस शाळेत हजर राहून शैक्षणिक कार्य करीत आहेत.आदिवासी भागातील शाळांचे शिक्षक कर्तव्यावर येतात किंवा नाही, याची पालकांना कल्पना नसते. शाळा व्यवस्थापन समितीमध्येही हेच आदिवासी बांधव असल्याने ते शाळेत कधी विचारपूस करीत नाही. त्यांच्या अज्ञानाचा फायदा मुख्याध्यापकासह शिक्षकांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याने पाचवी ते आठवीमधील विद्यार्थ्यांना त्यांचे नावसुद्धा धड लिहिता येत नाही, अशी अवस्था आहे. दर्यापूर, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, अमरावती, चांदूर रेल्वे येथील काही शिक्षक मेळघाटातील चिखलदरा व धारणी या दोन्ही तालुक्यांमध्ये रुजू झाले असून, शाळा परिसर किंवा मेळघाटात न राहता घरून ये-जा करतात. त्यामुळे शैक्षणिक कार्य खंडित झाले आहे.शिक्षण विभागाचे अधिकारी मॅनेजशिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर शिक्षक शाळेत गैरहजर आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई न करता प्रकरण मॅनेज केले जाते. हे शिक्षक देणे-घेणे करून प्रकरण दाबून टाकण्यात कमालीचे तरबेज झाले आहेत. त्याचा परिणाम प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांवर झाला आहे.

पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा दबावशिक्षणाचा खेळखंडोबा होण्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच काही पदाधिकारी व लोकप्रतिनिधीही जबाबदार आहेत. आपला कार्यकर्ता आपल्या संबंधातील नातेवाइक असून, त्याला मदत करण्याची भाषा अशा प्रसंगी वापरली जाते, तर कुठे-कुठे हेसुद्धा प्रकरण मॅनेज करून देवाण-घेवाण झाल्याची उदाहरणे पुढे आली आहेत. त्यामुळे शिक्षण विभागावर मरगळ आली असून, आदिवासी मुले शिक्षणापासून दूर होत चालली आहेत.धारणी पंचायत समितीमधील बऱ्याच शाळांना आकस्मिक भेटी देऊन शिक्षकांचे निलंबन केले आहे. यापुढे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना आपल्या बिटमध्ये शैक्षणिक स्तर वाढविण्याबाबत सूचना केल्या जातील व गैरहजर शिक्षकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल.-उमेश देशमुख, गटविकास अधिकारी, पं.स. धारणी.

टॅग्स :educationशैक्षणिक