शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

शिक्षकांच्या बदल्यांचे अजूनही भिजतघोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST

अमरावती : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यांसंदर्भातील धोरण निश्चित केलेल्या समितीने १५ मार्च २०२० रोजी शासनाला ...

अमरावती : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यांसंदर्भातील धोरण निश्चित केलेल्या समितीने १५ मार्च २०२० रोजी शासनाला अहवाल सादर केला. यावरून शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांबाबत कार्यपद्धती जाहीर होणार होती. मात्र, १० महिने उलटूनही धोरण जाहीर न झाल्याने जिल्हा परिषद शिक्षकांना पुन्हा ऑफलाइन बदली धोरणाची भीती वाटू लागली आहे.

कोरोना संसर्गामुळे सरकार हे धोरण जाहीर करू शकले नाही. मात्र, आता ग्रामविकास विभाग व शालेय शिक्षण विभागाने धोरण जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी शिक्षक व शिक्षक संघटनांकडून होत आहे. शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करावयाच्या की, याबाबत अभ्यास गटाचा अहवाल सादर करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. यात ५ जिल्हा परिषदांच्या सीईओंच्या अभ्यास गटाने शिक्षक बदल्यांबाबत अहवाल तयार करून तो सरकारला सादर केला आहे. बदल्यांचा नवा पॅटर्न कसा असेल याची सर्वांना उत्सुकता आहे. बदलीचे धोरण लवकर जाहीर न झाल्यास सरपंचपदाच्या निवडीप्रमाणे जनभावना लक्षात न घेता हा निर्णय बदलला जाऊन ऑफलाईन बदल्यांना प्राधान्य देण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाला शिक्षक संघटनांनी शिफारशी केल्या आहेत. आदिवासी दुर्गम, नक्षलग्रस्त भागातील शिक्षकांच्या बदल्या होणे आवश्यक आहे. या क्षेत्रात कार्यरत शिक्षकांनी तीन वर्षांचा कार्यकाळ निश्चित करावा, तीन वर्षे सेवा झाल्यानंतर त्यांच्या बदल्या तालुक्याच्या ठिकाणी कराव्यात, शिक्षकांच्या बदल्यांत खो पद्धत बंद करून टक्केवारी ठरवून बदली करावी. सर्व संवर्गातील शिक्षकांना समान न्याय द्यावा, नवीन बदली धोरणाची अंमलबजावणी करून या वर्षाच्या शिक्षक बदल्या तात्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी राज्यस्तरीय शिक्षक संघटनांनी शासनाला केली आहे.

कोट

शिक्षक बदल्यांसंदर्भात धोरण ठरविण्यासाठी शासनाने अभ्यास गट स्थापन केला होता. या गटाने शिक्षक व शिक्षक संघनांचे म्हणणे ऐकून घेतले होते. त्यानुसार शिक्षक संघटनांनी दिलेल्या सूचनांचा विचार करून बदली धोरण शासनाने जाहीर करावे.

- राजेश सावरकर,

राज्य प्रतिनिधी

प्राथमिक शिक्षक समिती