शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

शिक्षक समायोजन, बदल्यांना स्थगिती

By admin | Updated: June 14, 2016 00:02 IST

जिल्हा परिषदेतील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचे समायोजन व बदली प्रक्रियेला अखेर स्थगिती मिळाली आहे.

आदेश धडकले : श्रीकांत देशपांडेंचा पाठपुरावाअमरावती : जिल्हा परिषदेतील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचे समायोजन व बदली प्रक्रियेला अखेर स्थगिती मिळाली आहे. १३ जून रोजी ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे अवर सचिव पी.एस. कांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिले आहेत. सुधारित संचमान्यता पूर्ण होईपर्यंत समायोजन आणि बदली प्रक्रिया थांबविण्यात यावी, अशी मागणी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी ग्रामविकासमंत्र्याकडे केली होती. त्यानुषंगाने स्थगितीचे आदेश धडकले आहेत. जिल्हा परिषदेकडून मागील दोन दिवसांपासून शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविली जात होती. स्थगितीच्या आदेशाने जिल्हा परिषद शिक्षण विभाग तोंडघशी पडला आहे.संचमान्यता व विषयनिहाय पदनिश्चितीमध्ये बदल झाल्याने राज्यातील अनेक शाळांमधील संचमान्यता त्रुटीपूर्ण आहे. जोपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक संचमान्यता अंतिम होत नाही. तोपर्यत समायोजनाची प्रक्रिया थांबवावी व जिल्हा आणि तालुकास्तरावरील बदली प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची विनंती आ. श्रीकांत देशपांडे यांनी ६ जून रोजी ग्रामविकासमंत्री पकंजा मुंडे यांना पाठविलेल्या पत्रातून केली होती. त्यानुसार याप्रकरणाची चौकशी होईपर्यंत बदली प्रक्रियेस व निर्गमित केलेल्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे काढलेल्या आदेशाची प्रत विभागीय आयुक्तांनाही पाठविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने राबविलेली बदली प्रक्रिया पुन्हा अडचणीत आली आहे. आ. श्रीकांत देशपांडे यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग तोंडघशी पडला आहे.