शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

चहा १५ रुपये कट पाण्यातून आजार मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 22:42 IST

चहा टपरीवर फाइव्ह स्टारचे दर आणि पिण्याच्या पाण्यातून आजार मोफत असा प्रकार येथील शासकीय आयटीआयला लागून असलेल्या इमारतीजवळील चहा कॅन्टिनजवळ उघड झाला आहे.

ठळक मुद्देटपरीवर फाइव्ह स्टारचे दर : अन्न विभागाकडून तपासणीची गरज

संदीप मानकर।आॅनलाईन लोकमतअमरावती : चहा टपरीवर फाइव्ह स्टारचे दर आणि पिण्याच्या पाण्यातून आजार मोफत असा प्रकार येथील शासकीय आयटीआयला लागून असलेल्या इमारतीजवळील चहा कॅन्टिनजवळ उघड झाला आहे. हा प्रकार ‘लोकमत’ने कॅमेरात कैद केला आहे.कृष्णा राऊत नामक व्यक्तीने वाहतूक शाखेसमोरील श्रीकृष्णपेठेकडे जाणाºया रस्त्यावर अतिक्रमण करून कॅन्टिन थाटले आहे. वर्दळीच्या रस्त्यावर चहाटपरी थाटून व्यवसाय करीत असल्याने या ठिकाणी वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. या कॅन्टिनवर मिळणारा १५ रुपये कट प्रमाणे चहा हा शहरातील सर्वात महागडा चहा असू शकतो. कॉफीचे दर येथे ३० रुपये आहेत. हा दर घणारा कॅन्टिन संचालक पिण्याच्या पाण्याबाबत मात्र पूर्णपणे बेफिकीर आहे. पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजार वाटण्याचा जणू त्याने धंदाच थाटला आहे. हा प्रकार खुुलेआम सुरू असताना याकडे अन्न प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.काही दिवसांपूर्वी दहा रुपये कटप्रमाणे चहाची विक्री करण्यात येत होती. चहा चांगला मिळत असल्यामुळे दिवसभर या ठिकाणी ग्राहकांची गर्दी असते. या संधीचा फायदा घेऊन चार दिवसांपूर्वी १५ रुपये कट प्रमाणे चहा विक्री सुरू करण्यात आल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. कॅन्टिनवरील हा चहा म्हणजे सद्यस्थितीत शहरातील सर्वात महागडा चहा म्हणून या कॅन्टिनची ओळख निर्माण झाली आहे. मात्र, नागरिकांना या दरानुसार चांगली सेवा देण्यात सदर टपरीचालक अपयशी ठरत आहे. अतिशय घाण पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याची नागरिकांना साधी कल्पनाही नसेल. चहा करण्यासाठीसुद्धा या घाण पाण्याचा वापर केला जात असावा. नागरिकांना पिण्यासाठी वापरण्यात येत असलेले पाणी किती अशुद्ध व घाणेरडे आहे, यासंदर्भात रविवारी सदर प्रतिनिधीने पाहणी केली. यावेळी धक्कादायक बाब पुढे आली. येथे ठेवण्यात आलेली पाण्याची कॅन उघडली असता, त्यामध्ये तळाशी केसांचा पुंजका आढळून आला. पाण्यात मोठ्या प्रमाणात माती व धूलिकणांचा थर आढळून आला. नळातून पाणी घेण्याच्या सवयीमुळे हा प्रकार नागरिकांच्या पुढे कधीच आला नसेल, मात्र सदर प्रकार कॅमेºयात कैद करण्यात सदर प्रतिनिधीला यश आले. असाच प्रकार रोज या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, याकडे आतापर्यंत कुणीही लक्ष दिले नाही.रस्त्यावरच ही चहाटपरी असल्याने व कॅनचे झाकण अनेकदा उघडेच राहत असल्याने रस्त्यावरील धूलिकण या कॅनमधील पिण्याच्या पाण्यात जातात व येथून नागरिकांच्या पोटात पाणी गेल्यानंतर या पाण्यातून जलजन्य आजारांची मालिका सुरू होते. टायफॉइड, कावीळ, हगवण यासारखे आजारात होतातच तसेच पोटाचे विकारसुद्धा बळावत आहेत. मात्र, बेभाव पैसे घेऊनही नागरिकांना अशा प्रकारचे आजार विकणाºयांना काहीही लोकांच्या जीविताशी घेणेदेणे नसल्याचे निदर्शनास आले आहे. उलट आपणच चांगला चहा विकतो. असा अभिमान बाळगून सदर चहाटपरी संचालकाने व्यवसाय राजरोसपणे थाटला आहे. पण, आपण कशाला मध्ये पडावे, असे म्हणून अनेकदा हा प्रकार चव्हाट्यावर आला नाही. चांगला चहा मिळत असल्याची ओळख सदर टपरीवाल्यांची निर्माण झाल्याने लहान व्यापाºयांपासून तर उच्चविद्याविभूषित या कँटिनवर उभे राहून चहाचा आस्वाद घेतात.दूषित पाणी पिण्यात आल्याने अनेक प्रकारचे जलजन्य आजार होतात. यामध्ये पोटाचे विकार, डायरिया, कावीळ यांसारख्या आजाराची शक्यता अधिक असते.- अतुल यादगीरे,कर्करोग तज्ज्ञ, अमरावती.मी माझ्या सहकाऱ्याला चांगले पाणी आणण्यास सांगितले होते. पण, कशी धूळ गेली, कळले नाही. पुन्हा असे पाणी वापरले जाणार नाही.- कृष्णा राऊतचहाटपरी संचालक