शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

कर वसुली लिपिकांना ‘अल्टिमेटम’

By admin | Updated: April 12, 2017 00:41 IST

मालमत्ता कराची वसुली वाढविण्याबरोबरच मागणी वाढविण्यासाठी कर वसूली लिपिकांना ३ महिन्यांचा अल्टिमेटम देण्यात आला.

आयुक्त आक्रमक : महापालिकेत ‘इनकॅमेरा बैठक’, तीन महिने मुदतअमरावती : मालमत्ता कराची वसुली वाढविण्याबरोबरच मागणी वाढविण्यासाठी कर वसूली लिपिकांना ३ महिन्यांचा अल्टिमेटम देण्यात आला. त्यानंतर आपण कुठलीही सबब ऐकून घेणार नसल्याची तंबी आयुक्तांकडून देण्यात आली.मालमत्ता कराची वसूली माघारल्याच्या पार्श्वभूमिवर आयुक्तांनी मंगळवारी पाचही झोनमधील सहायक आयुक्तांसह कर वसुली लिपिकांचे मॅराथॉन बैठक घेतली. महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात घेण्यात आलेली ही बैठक पहिल्यांदाच इन कॅमेरा घेण्यात आली. तथा त्यांच्या जोरदार कानपिचक्या घेण्यात आल्या.महापालिकेच्या पाच प्रशासकीय झोनमधून २०१६-१७ या आर्थिक वर्षात ४१.५९ कोटी रुपयांचा मालमत्ता कराची मागणी होती. त्यात २४ कोटींची फ्रेश, तर १७ कोटींची थकबाकी होती. तथापि ३१ मार्च २०१७ पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत केवळ ३० कोटी रुपये महसूल गोळा झाला. त्यापार्श्वभूमिवर ही बैठक घेण्यात आली. कराच्या अखत्यारित नसलेल्या मालमत्तांना कर लावावा, ज्या मालमत्तांचा वापर बदलला त्या मालमत्तांना बदललेल्या वापरानुसार कर लावावा,ज्या मालमत्तांना कमी कर लागला त्या मालमत्तांसह अनधिकृत बांधकामाला कर लावण्यात यावा,तसेच खुल्या भूखंडांना कराच्या अखत्यारीत आणण्याच्या सुचना आयुक्तांनी दिल्या. या बैठकीला मुद्दामहून स्थायी समिती सभापती तुषार भारतिय यांना आमंत्रि करण्यात आले होते.३ महिन्यात मालमत्ता कराची मागणी आणि वसुलीत सातत्य राखून दिलेल्या संधीचे सोने करावे, अन्यथा कारवाईला सामोर जावे लागले, अशी ताकिद दिली. महापालिकेची आर्थिक मदार केवळ मालमत्ता करावर अवलंबून असल्याने कर वसुली लिपिक किती महत्त्वपूर्ण घटक आहे,हे लक्षात घेणे गरजेचे असल्याचे मत भारतीय यांनी व्यकत केले. महापालिकेच्या स्वउत्पन्नावर शासनाचे अनुदान अवलंबून असल्याने कुठल्याही परिस्थितीत वसुली वाढवावीच लागेल, अशी आग्रही सूचना त्यांनी केली. नगरविकास विभागाने १ मार्चला शासननिर्णय काढून महापालिकांना १०० टक्के कर वसुलीचे निर्देश दिली होते. त्या अनुषंगानेमहापालिका केवळ ७२.९६ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकल्याची शल्य आयुक्त हेमंत पवार यांनी बोलून दाखविले. (प्रतिनिधी)आयुक्तांचा भ्रमणध्वनी सार्वजनिक ज्या मालमत्तांना आतापर्यत कर लागलेला नाही ,अशा मालमत्ता धारकांनी आपल्या ९०४९०९०४९० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन या बैठकीदरम्यान अमरावतीकरांना करण्यात आले. शहरातील नागरिकांना अधिक सोईसुविधा देण्याकरिता महापालिका आर्थिकरीत्या संपन्न असणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनीही आपल्या शहराच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयुक्त हेमंत पवार यांनी केली.- तर एसीबींकडे देऊ !बहुतांश कर वसुली लिपिक प्रामाणिक आहेत. मात्र बोटावर मोजण्याइतपत लिपिकांमुळे मालमत्ता कर विभागाची इभ्रत जात असल्याची खंत व्यक्त कराताना अशांनी सुधारणा न केल्यास त्यांची एसीबीकडून चौकशी करण्यात येईल व कडक कारवाई करण्यात येईल, अशी तंबी आयुक्तांनी दिली. त्यामुळे तीन महिन्याात सर्व वसुली लिपिकांनी रिझल्ट द्यावेत, अशा सूचना देण्यात आल्या.