शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

आरटीई प्रवेशाच्या शाळा रजिस्ट्रेशन शंभर टक्के नोंदणीचे टार्गेट; प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे आदेश  

By जितेंद्र दखने | Updated: March 8, 2024 20:12 IST

दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक सत्र २०२४-२५ या वर्षात आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येणार आहे.

अमरावती: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित, स्वयंमअर्थसहाय्यित, विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुलामुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने आरटीई प्रवेशाकरिता वरील शाळांचे १०० टक्के नोंदणीचे टार्गेट प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहे. याकरिता ६ ते १८ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत आरटीई अंतर्गत पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन पूर्ण न केल्यास याची शिक्षणाधिकारी प्राथमिक व प्रशासन अधिकारी यांच्या जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचे शिक्षण संचालकांनी या आदेशात स्पष्ट केले आहे.

दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक सत्र २०२४-२५ या वर्षात आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २५ टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांची ऑनलाइन नोंदणी येत्या १८ मार्च पर्यंत करणे आवश्यक आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत आता यापुढे विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किमी अंतरावरील शासकीय किंवा अनुदानित शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पहिल्यांदा शाळांचे रजिस्ट्रेशन करून सर्व शाळांचे मॅपिंग केले जाणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हाभरात ६ मार्चपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या शाळांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्ह्यात आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व शाळांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत सूचना दिलेल्या आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार शाळा ऑनलाइन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू केलेली आहे. - बुद्धभूषण सोनोने, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, अमरावती

टॅग्स :AmravatiअमरावतीSchoolशाळा