शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

‘त्या’ भरकटलेल्या महिलेची कुटुंबाच्या शोधार्थ तगमग

By admin | Updated: October 26, 2016 00:11 IST

परराज्यातील एक महिला जखमी अवस्थेत बडनेरा मार्गावर रक्तबंबाळ अवस्थेत पडून होती.

इर्विनमध्ये आक्रोश : संवादात भाषेचा अडसर अमरावती : परराज्यातील एक महिला जखमी अवस्थेत बडनेरा मार्गावर रक्तबंबाळ अवस्थेत पडून होती. तिला १०८ रूग्णवाहिकेने इर्विन रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तिच्याशी संवाद साधण्यात भाषेचा अडसर येत असून आपल्या आप्तस्वकीयांपर्यंत आणि घरापर्यंत पोहोचण्यासाठी चाललेली तिची तगमग बघवत नाही. तिचा आक्रोश पाहून परिचारिकांची मनेही हेलावली. तिचे हिरावलेले कुटुंब परत मिळवून देण्याकरिता महिला बालविकास अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बडनेरा मार्गावरील समर्थ हायस्कूल चौकात ४० वर्षे वयोगटातील महिला जखमी अवस्थेत पडून होती. तिच्या डोक्याला गंभीर जखमा असल्याने ती रक्कबंबाळ झाली होती. काही नागरिकांनी सौजन्य दाखवून १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेला पाचारण केले आणि तिला इर्विनमध्ये दाखल केले. सद्यस्थितीत तिच्यावर वार्ड क्रमांक ९ मध्ये उपचार सुरू आहेत. तेथील वरिष्ठ परिचारिका अलका सिरसाट त्या महिलेची विशेष काळजी घेत आहेत. आज तीच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा जाणवली. मात्र, तिची तुटक-तुटक भाषा कोणाच्याही लक्षात येण्यासारखी नसल्याने ती नेमकी कुठली, हे कळू शकले नाही. मात्र, अलका शिरसाट यांनी तिला बोलके करून तिच्या हावभावावरून बरेच काही जाणून घेतले. ती महिला आंध्रप्रदेशातील भाषा बोलते, वालमादेवीचे नाव घेते. तिला तिच्या मुलांना भेटायचे आहे. त्यासाठी तिचा आक्रोश सुरू आहे. तिला तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवून देण्याकरिता परिचारिका शिरसाट झटत आहेत. त्यांनी या महिलेबाबत कोतवाली पोलिसांना माहिती दिली आहे. तसेच महिला बालविकास अधिकारी कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना पत्र सुद्धा दिले आहे. त्यांनी ‘त्या’ महिलेच्या संगोपनासाठी पुढील प्रक्रिया सुरू केली असून तिला अकोला येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात येणार आहे. मात्र, त्या महिलेची काळजी घेता-घेता निर्माण झालेल्या जिव्हाळ्यामुळे तिला सुधारगृहात नव्हे तर हक्काचे घरच मिळावे, यासाठी अलका सिरसाट झटत आहेत. त्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करण्याची तयारी परिचारिका सिरसाट यांची आहे. मात्र, यासाठी कोण पुढाकार घेणार, हा खरा प्रश्न आहे. महिला बालविकास अधिकारी कार्यालयाने या महिलेच्या कुटुंबाचा शोध घेऊन तिची तिच्या आप्तेष्टांसोबत भेट घडवून आणावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यासाठी त्या संबंधितांचे उंबरठे झिजवित आहेत. (प्रतिनिधी)लैंगिक अत्याचार तर झाला नाही ना ?राज्याबाहेरील महिलेला अमरावती आणले कुणी, ती जखमी झाली कशी, तिच्यावर लैंगिक अत्याचार तर झाला नाही ना, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यासंदर्भात पोलीस विभागाला कळविण्यात आले आहेत. मात्र, त्या दिशेने अद्याप पोलिसांनी चौकशी सुरु केलेली नाही.