शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूचा राज्यपालांनी केली अमरावती जिल्ह्यातील वज्झरच्या अनाथ दिव्यांगाची विचारपूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 18:50 IST

बुधवारी सकाळी नऊ वाजता मोबाइल खणखणतो. शंकरबाबा आप कैसे हो ...बच्चे कैसे है? मै आपकी क्या मदत कर सकता हू? असेही विचारले जाते. कुशलक्षेम कळविल्यानंतर पैसे किती पाठवायचे? अशीही पलीकडून विचारणा होते. पैसे नकोत; त्याऐवजी किराणा पाठवा, असे शंकरबाबा सांगतात.

ठळक मुद्दे शंकरबाबांच्या मुलांसाठी पाठविला किराणाकाळजी घेण्याचा दिला संदेश

नरेंद्र जावरे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बुधवारी सकाळी नऊ वाजता मोबाइल खणखणतो. शंकरबाबा आप कैसे हो ...बच्चे कैसे है? अशी आपुलकीची सर्व विचारणा होते. मै आपकी क्या मदत कर सकता हू? असेही विचारले जाते. कुशलक्षेम कळविल्यानंतर पैसे किती पाठवायचे? अशीही पलीकडून विचारणा होते. पैसे नकोत; त्याऐवजी किराणा पाठवा, असे शंकरबाबा सांगतात. तात्काळ किराणा दुकानदाराचा बँक अकाऊंट नंबर घेऊन ५१ हजार रुपये पाठविले जातात.मागील पंधरा वर्षांच्या मैत्रीचा उजळा देत कोरोना संकटात शंकरबाबांची आठवण करणारे हे आहेत तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित. मदतीपेक्षा आपुलकीने विचारल्यानेच वज्झरचे अनाथालय भारावून गेले आहे. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांची मैत्री १५-२० वर्षांपेक्षा अधिक जुनी आहे. नागपूरचे खासदार होण्यापूर्वी पुरोहित यांनी स्व. अंबादासपंत मतिमंद अनाथ बालगृहाला अनेकदा भेटी दिल्या आणि मदतही केली आहे.किराणा व्यावसायिकाच्या खात्यात रक्कमपरतवाडा येथील एका किराणा दुकानदाराचा बँकेचा अकाऊंट नंबर समाजसेवक शंकरबाबा यांनी राज्यपालांच्या स्वीय सहायकाकडे पाठवला. त्यावर ५१ हजार रुपये तात्काळ खात्यात जमा करण्यात आले. शंकरबाबांच्या अनाथ, अपंग, बेवारस मुलांसाठी परतवाडा येथील त्या दुकानातून किराणा पाठविला गेला.जिल्हाधिकाऱ्यांना आदेशराज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्याशी संवाद साधल्यानंतर तत्काळ जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनाही संस्थेकडे लक्ष देण्याचे आदेश दिले.तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याशी जुनी मैत्री आहे. अधून-मधून ते विचारणा करीत असतात. त्यांनी बुधवारी सकाळी कॉल करून सर्वांची विचारपूस केली आणि स्वत: आग्रह करीत ५१ हजार रुपयांचा किराणा पाठविला.- शंकरबाबा पापळकर, ज्येष्ठ समाजसेवक

 

टॅग्स :Banvarilal Purohitबनवारीलाल पुरोहितShankarbaba Papalkarशंकरबाबा पापळकर