शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचा बेमुदत संप

By admin | Updated: April 27, 2016 00:17 IST

राज्यात तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी मंगळवारपासून पुकारलेल्या बेमुदत संपाला जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

तहसीलदारांकडे चाव्या सुपूर्द : कार्यालयांना टाळेअमरावती : राज्यात तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी मंगळवारपासून पुकारलेल्या बेमुदत संपाला जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ९६ मंडळ अधिकारी तर ५१४ तलाठी जिल्ह्यात संपावर गेले आहेत. दरम्यान तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना चाव्या सुपूर्द करून बेमुदत संपावर जात असल्याचे स्पष्ट केले.नागपूर येथील विदर्भ पटवारी संघाच्या नेतृत्वात तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संपाची हाक दिली. या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला. तलाठी कार्यालयांना टाळे लावण्यात आले. तसेच अमरावती तहसील कार्यालयांतर्गत मंडळ अधिकारी, तलाठी १०० टक्के बेमुदत संपावर गेल्यामुळे नियमित काम प्रभावीत झाल्याचे दिसून आले. २६ एप्रिलपासून सुरू झालेल्या बेमुदत संपावर शासन, प्रशासन स्तरावर तोडगा निघेस्तोवर कामकाज सुरू करणार नाही, अशी भूमिका मंडळ अधिकारी, तलाठ्यांनी घेतल्यामुळे तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. येथील तहसील कार्यालयात तलाठी, मंडळ अधिकारी एकत्रित येऊन मागण्यांबाबत बैठक घेतली. त्यानंतर तहसीलदार सुरेश बगळे यांना मागण्यांचे निवेदन वजा कार्यालयांच्या चाव्या सुपूर्द केल्या. शासन स्तरावर मागण्यांचा विचार होईस्तोवर बेमुदत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका विदर्भ पटवारी संघ उपविभाग अमरावतीचे अध्यक्ष एस. आर. उगले, सचिव ए. एम. पाटेकर यांनी घेतली. यावेळी तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी मागण्यांची पुर्तता करण्यासाठी जोरदार नारेबाजी करुन अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. आंदोलनात संतोष चपटे, सुनील भगत, यू. आर. शेगावकर, महेंद्र कंगाले, नीलिमा अंभोरे, डी.एम. धोटे, एम. पी. देशमुख, डी. जी. गावनेर, एस. आर. भगत, एम. डी. सांगळे, आर. एल. बाहेकर, एम. एस. धर्माळे, आर. आर. काळबांडे, टी.एस. मोहोड, जे. जी. लांडगे, एन. के. लोथे आदी उपस्थित होते. तलाठ्यांनी जलयुक्त शिवार, पाणी टंचाई आदी कामांना प्राधान्य देण्याचे ठरविले.(प्रतिनिधी)