शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगाव बारीत विद्यार्थी साकारताहेत श्रमदानातून तलाव

By admin | Updated: May 30, 2016 00:29 IST

दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी बडनेरा येथील कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने अंजनगाव बारीत तलाव प्रकल्प निर्मितीस प्रांरभ केला.

गावकऱ्यांचीही मदत : ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानातून प्रेरणाअमरावती : दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी बडनेरा येथील कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने अंजनगाव बारीत तलाव प्रकल्प निर्मितीस प्रांरभ केला. 'लोकमत'ने सुरू केलेल्या जलमित्र अभियानातून प्रेरणा घेत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या या महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रम अधिकारी संतोष बनसोड यांनी अंजनगाव बारीतील ५२ एकर परीक्षेत्राची पाहणी केली. त्यामध्ये कोंडेश्वरजवळील पहाडावरून उतरणारे पाणी अडविता येऊ शकते, असे त्यांच्या लक्षात आले. अखिल भारतीय जैन संघटनेचे उपाध्यक्ष सुदर्शन गांग व समाजसेवक प्रदीप जैन यांनी संतोष बनसोड यांना प्रोत्साहित केले. गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादअमरावती : त्यानुसार त्यांनी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रकल्पस्थळ निश्चीत करून पाणी अडवा, पाणी जिरवा, उपक्रमास सुरुवात केली. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी अंजनगावात जनजागृती करून गावकऱ्यांना संघटीत केले. त्यानंतर जोमाने या प्रकल्पास सुरुवात करण्यात आली. यामध्ये संरपंच मंदा कडबे, उपसंरपंच लक्ष्मण कदम, पोलीस पाटील तेटू ताई, दिनेश शिरसागर, संतोष इंगळे, रोषन पुनिया, रवि बान्ते, विक्रम पिसे आदिनी हे कार्य सुरु केले. या प्रकल्पाचा पायाभरणा अमरावती विद्यापीठाचे समन्वयक गणेश माल्टे यांनी केला, यावेळी माजी समन्वयक श्रीकांत पाटील, ओ.बी.मुंदे, प्राचार्य गोपाल वैराळे यांची उपस्थिती होती. या प्रल्कपासाठी कला महाविद्यालयातील तब्बल १५० विद्यार्थी व ५० माजी विद्यार्थी व शेकडो गावकऱ्यांनी संयुक्तरित्या श्रमदानाला सुरुवात केली. पहाडावरून साठवण केलेले हे पाणी शेतीसाठी उपयोगी ठरणारे असून जनावरांसाठीसुध्दा सोयीचे होणार आहे. त्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणात जलसंवर्धन होणार आहे. या प्रकल्पास नरेंद्र मोटवाणी, सांकेत ठाकूर, उमेश गिलोरकर, मंगेश कळसकर व अंजनगाव बारीजवळील गावातील नागरिक भेटी सुध्दा देत आहे.