तापमानाचा पारा ४६ अंशांवर, अंगाची लाहीलाही : उष्माघात टाळण्यासाठी घ्या दक्षताअमरावती : अनेक दिवसांपासून शहरासह परिसराच्या तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. उन्हाळ्यात उष्माघातासह विविध आजार होण्याची शक्यता असते. परंतु थोडी दक्षता घेतली तर हे आजार टाळता येऊ शकतात. या दिवसात पचनक्रिया मंदावत असल्याने हलका आहार घेण्यासह पांढरे कपडे वापरण्यावर नागरिकांनी भर द्यावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने सर्वांगाचा दाह होणे, अतिसार, लघवीत जळजळ होणे, उलटी तसेच डोकेदुखीसारखे त्रास होतात. सतत घाम येण्यामुळे शरीराला दुर्गंधी तसेच विविध त्वचारोग होण्याची शक्यता असते. अंगावर घामोळ्या होतात. कडक उन्हात प्रमाणापेक्षा अधिक काळ काम केल्याने त्वचा लाल किंवा काळसर पडते. त्यामुळे या दिवसांत उन्हापासून बचाव होण्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेण्याची गरज असते, घराबाहेर पडताना दुपट्टा, टोपी वापरावे, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. (प्रतिनिधी)उन्हाळ्यात असे होतात आजारसर्वांगदाह : या व्याधीत संपूर्ण शरीराची आग होते आणि चेहरा तसेच त्वचा निस्तेज होते. उत्साह कमी होतो. सर्वांग दाहाचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला थंड वातावरण ठेवावे. उन्हात जास्त काळ फिरु देऊ नये, शरीर वरचेवर थंड पाण्याने पुसून घ्यावे. उष्माघात : शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने ग्लानी तसेच चक्कर येते. डोके दुखणे, डोळ्यांची आग होते. खूप तहान लागते. तसे झाल्यास रुग्णाला थंड वातावरणात झोपवावे. शरीर थंड पाण्याचे पुसून घ्यावे. डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवावी, अशी रुग्णांनी कडक उन्हाच्या वेळी बाहेर पडू नये. कांद्याचा रस तळहाताला लावावा तसेच लिंबू पाण्याचे प्राशन करावे. लघवीला त्रास : या दिवसात लघवी होण्यास त्रास होतो. शरीरात वाढलेल्या उष्णतमुळे लगवीत उष्णता निर्माण होते. हा त्रास होणाऱ्यांनी दिवसातून तीन ते चार वेळा निंबू-सरबत घ्यावे. तसेच नारळ पाणी, कोकण सरबतही घ्यावे. एक चमचा जरे, एक चमा धणे ग्लासभर पाण्यात रात्री भिजत घालून सकाळी हे मिश्रण गाळून घ्यावा आणि त्यात चमचाभर खडीसाखर टाकून सेवन करावे. आहार कसा असावा अन् त्याची काळजी कशी घ्यावी याबाबत दक्ष राहावे. वात व पित्तदोषाची वृद्धी होत असल्याने वातूक पचायाला जड तिखट तसेच जास्त गरम आहार टाळावा. मुगाची खिचडी किंवा वरण तसेच पालेभाज्यांचे प्रमाण आहारात वाढवावे. टरबुज, खरबुज, संत्री, मोसंबी, केळी, सीताफळ, काकडी, द्राक्षे इत्यादी फळे खावी. उसाचा रस, कोकण सरबत, फळांचा ताजा रस घ्यावे. मांसाहार टाळावा, लोणी, श्रीखंड मावा दहीचे सेवन करावे. डोक्याला पांढरा रुमाल बांधूनच घराबाहेर पडावे. उन्हातून आल्यावर फ्रीजचे पाणी पिऊ नये, कांद्याचे सेवन करावे.
हलका आहार घ्या, पांढरे कपडे परिधान करा
By admin | Updated: May 17, 2016 00:11 IST