लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युवकांना रोजगार मिळवून देण्याकरिता परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर यांनी पुढाकार घ्यावा, यासंदर्भाचे साकडे घालत त्यांच्याशी जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी अमरावती येथे शुक्रवारी भेट घेवून त्यांच्या विविध विषयावर हितगुज केली. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ मुबंईचे अध्यक्ष, रामेश्वर पवार यांचही उपस्थिती होती. चर्चेदरम्यान आयटी क्षेत्रातील युवकांकरिता रोजगार निर्मितीसाठी आपण पुढाकार घ्यावा, असे जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी विजय भटकर यांना साकडे घातले. पवार यांनी महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळ पुरातन असून, १२ हजार ग्रंथालयांमधून लोकांमध्ये जागृती करीत असल्याचे संघाच्या अक्कलकोट येथे होत असलेल्या राज्यव्यापी भव्य अधिवेशनासाठी निमंत्रित केले. याप्रसंगी ग्रंथालय अत्याधुनिक होऊन लोकाभिमुख करण्याची अपेक्षा डॉ. भटकर यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केली.
रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:52 IST
युवकांना रोजगार मिळवून देण्याकरिता परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर यांनी पुढाकार घ्यावा, यासंदर्भाचे साकडे घालत त्यांच्याशी जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी अमरावती येथे शुक्रवारी भेट घेवून त्यांच्या विविध विषयावर हितगुज केली. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ मुबंईचे अध्यक्ष, रामेश्वर पवार यांचही उपस्थिती होती.
रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घ्या
ठळक मुद्देअविनाश काठोळे : डॉ.विजय भटकर यांना साकडे