अमरावती : पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे पत्रकांरासोबत भेदभाव करीत असून त्यांना जनसपंर्क अधिकारी पदाहून तत्काळ काढण्यात यावे, अशी एकमुखी मागणी पत्रकारांनी मगंळवारी सायकांळी पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्याकडे केली. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांना पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार जनसंपर्क अधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे.अणेंची माहिती दिशाभूल करणारीअणे यांना पोलीस आयुक्तांच्या जवळील व्यक्ती असल्याचा संभ्रम प्रत्येकांमध्ये निर्माण झाला होता. मात्र त्यांनी पदाचा गैरवापर करुन पत्रकांराची दिशाभुल करीत असल्याचे पत्रकारांना आढळून आले आहे. त्यातच अणे पत्रकारांविषयी पोलीस आयुक्तांना वेगळीच माहिती देत होते तर पत्रकांराना ते वेगळी माहिती देत असल्याचे निदर्शनास आले आहे. पत्रकारांशी जवळीक साधून त्यांचे मनोरजंन करण्याचेही कार्य करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजता पोलीस आयुक्त यांच्या निर्देशाहून पत्रपरिषेदचे आयोजन करण्यात आले होते. त्याबाबत अणे यांनी सर्व पत्रकांरांना तश्या सुचना वॉटस अॅपच्या माध्यमातून दिल्या होत्या. मात्र केवळ तीन पत्रकारांच्या विनंतीने त्यांनी पत्रपरिषेद रद्द करुन पोलीस आयुक्तांना चुकीची माहिती दिल्याचे समजते. पत्रपरिषत रद्द झाल्याचे कळवून ती दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी ११.३० वाजताची घेण्यात येईल अशी माहिती अणेंनी पत्रकारांना दिली. त्यावेळी काही पत्रकांनी त्यांच्याशी सपंर्क करुन विचारणा केली असता त्यांनी बुधवारी ५ वाजता पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे. त्यामुळे पत्रपरिषद रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आहे. अणे यांचा असा व्यवहार काही पत्रकांरांना अडचणीचा ठरला असून त्यांनी तत्काळ पोलीस आयुक्तांशी सपर्क साधून विचारणा केली. अणे यांचे जनसपंर्क अधिकाऱ्याचे पद रद्द करुन दुसऱ्या अधिकाऱ्यांला देण्याची मागणी मागणी पत्रकारांनी केली होती. पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी पत्रकारांसमोर खेद व्यक्त केला.
पोलीस निरीक्षक अणे यांच्याकडील पदभार काढा
By admin | Updated: December 30, 2014 23:25 IST