शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोफत कायदे व शासकीय योजनांचा लाभ घ्या - न्या. मुकुल गाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 19:34 IST

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत या वर्षीपासून पहिल्यांदाच सर्व शासकीय कार्यालयांमार्फत गोरगरिबांसाठी राबविल्या जाणा-या योजनांची माहिती थेट गावपातळीवर देण्याचा उपक्रम राबविला जात आहे.

धारणी (अमरावती) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत या वर्षीपासून पहिल्यांदाच सर्व शासकीय कार्यालयांमार्फत गोरगरिबांसाठी राबविल्या जाणा-या योजनांची माहिती थेट गावपातळीवर देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. याचा अमरावती जिल्ह्यातील पहिला बहुमान धारणी तालुक्याला मिळाला. तालुक्यातील शिरपूर येथील नागरिक याचे प्रथम मानकरी ठरले आहेत.शिरपूर येथील जि. प. पूर्व माध्यमिक शाळेत आयोजित कायदे व शासकीय योजनांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पार पडले. मोफत कायदेविषयक मार्गदर्शन व विविध शासकीय योजनांचा लाभ घ्या व याची माहिती परिसरात द्या, असे आवाहन धारणी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी व फौजदारी न्यायाधीश मुकुल गाडे यांनी नागरिकांना याप्रसंगी अध्यक्ष स्थानाहून केले.तालुका विधी सेवा समिती, वकील संघ आणि शिरपूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सत्यदेव गुप्ता, तहसीलदार संगमेश कोडे, ठाणेदार किशोर गवई, उपसरपंच सुनील जायसवाल, पोलीस पाटील अंजली जांबडे मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक अ‍ॅड. सत्यदेव गुप्ता यांनी केले. तालुका विधी सेवा समितीमार्फत दिल्या जाणा-या योजनांची माहिती न्या. एम.एस. गाडे, तहसील कार्यालयातील माहिती नायब तहसीलदार आदिनाथ गाजरे, रोजगारविषयक माहिती दीपक कांबळे, कृषीविषयक योजनांची माहिती एस.आर. बेराड, वनविभागातील योजनांची माहिती वनपाल एस.एस. पाचंगे, तर महिला व बाल विकास कार्यालयातील योजनांची माहिती संरक्षण अधिकारी सचिन आसोले यांनी दिली. यावेळी सर्व विभागांनी कार्यक्रमस्थळी स्टॉल लावले होते. याचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला.