----
भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
अमरावती : माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत आणि गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी चेतन गावडे, किरण पातुरकर, चेतन गावंडे, सचिन रासने, प्रवीण तायडे, अजय सारसकर आणि १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संचारबंदी आदेशाच्या उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १८८, २६९, २७०, २७१, २९१ कलम २३४ साथीचे रोग अधिनियम कलम ५१ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम १३५ मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
----
भाजीपाला विक्रेता विरुद्ध कारवाई
अमरावती - गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत संचारबंदी दरम्यान भाजीपाला विक्री करताना आढळलेला इरफान खान शकील खान (२८, रा. ट्रांसपोर्टनगर) विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केला.
---------
संचारबंदीत सरबत विक्री
अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉ. पंजाबराव देशमुख हॉस्पिटल येथे सरबत विक्री करताना आढळलेल्या इस्माविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. दिनेश सहदेव हरणे (४२, रा. भीमनगर) असे आरोपीचे नाव आहे.
--------
भाजीपाला विक्री, पोलिसात गुन्हा
अमरावती : संचारबंदीच्या काळात भाजीपाला विक्री करणारे सचिन महादेव शिंदे (महेंद्र कॉलनी) व पवन सहदेव मोहोळ २२, रा. केवल कॉलनी) विरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
-----------
हातगाडी लावल्याप्रकरणी गाडगेनगरात गुन्हा
अमरावती : कॉलेज परिसरातील मुलींच्या वसतिगृहानजीक नारळपाणी विक्री करणारा अनुराग मारोतराव मोरे (१८, रा. आषाढी कॉलनी) विरुद्ध पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला.
-----------------
क्षुल्लक कारणावरून विक्रेत्याला जिवे मारण्याची धमकी
अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवननगर येथे फळविक्रेत्याला क्षुल्लक कारणावरून मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांनुसार संतोष पावडे (४५) अक्षय पावडे (२१), हर्षल पावडे (१८) व एका महिलेविरुद्ध पोलिसांनी भादंवि कलम ३०७, ५०४, ३२३, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. तक्रारदार महिलेचा पती रात्री साडेसात वाजता हात गाडीवरील मान देत असताना हर्षलने विनामोबदला द्राक्ष मागितले. महिलेच्या पतीला त्याने शिवीगाळ केली आणि आई-वडील व भावाला बोलावून आणले. दोन्ही भावांनी फळ विक्रेत्याचे हात मारण्याचा प्रयत्न केला याप्रकरणी अक्षय पावडे याला अटक करण्यात आली आहे राजापेठ पोलिस पुढील तपास करीत आहेत
संचार बंदीचे उल्लंघन दुकानदाराविरुद्ध गुन्हा अमरावती प्रतिनिधी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात चित्रा चौकातील विरुद्ध संचारबंदीत दुकान उघडे ठेवले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. नरेश जोधामल आहुजा (५५, रा. नवीन कॉटन मार्केट परिसर) असे संचालकाचे नाव आहे.
--------
शहर कोतवाली हद्दीत दुकानदाराविरुद्ध गुन्हा
अमरावती : शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीचे उल्लंघन करून दुकाने उघडी ठेवल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये यश नितीन धुवाविया (२४, रा. नमुना गल्ली नंबर २ व राहुल देवीलाल सुवालका (२३, रा. नमुना गल्ली नंबर ५ यांचा समावेश आहे.