लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डेंग्यूपाठोपाठ शहरात स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळल्याने अमरावतीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गतवर्षी स्वाईन फ्लूने महापालिका क्षेत्रात १० बळी घेतल्याने त्या भीतीत वाढ झाली आहे. मात्र, आजाराला न घाबरता खबरदारी हाच उपाय असल्याचे आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे.स्थानिक बालाजी प्लॉटमधील रहिवासी रुग्णाला नागपूर येथे उपचारासाठी हलविले असताना त्यांचा स्वॅब दूषित आढळून आल्याची माहिती आहे. त्याअनुषंगाने डेंग्यूपाठोपाठ स्वाईन फ्लूच्या संसर्गाचा धोका वजा भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी स्वाईन फ्लूने जीव गमावलेल्यांना अन्य शहरांमधून स्वाईन फ्लूचा संसर्ग झाला होता.दरम्यान, येथील एका खासगी रुग्णालयातून नागपूरला हलविलेल्या रुग्णाचा स्वाईन फ्लूचा स्वॅब पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सजग झाली असली तरी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वॅब किट उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणेची मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. स्वाईन फ्लूचा प्रतिबंध रोखण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे.जुलैपर्यंत २१ स्वॅब तपासणीसाठीस्वाइन फ्लूसंदर्भात २०१७ साली एकूण १८० रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. पैकी ४४ नमुने दूषित आढळून आलेत. सन २०१७ मध्ये महापालिका हद्दीतील १० जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला, तत्पूर्वी सन २०१६ मध्ये महापालिका क्षेत्रात एकही रुग्ण स्वाइन फ्लू संशयित आढळून न आल्याने स्वॅब घेण्यात आले नाहीत. सन २०१५ मध्ये ७३ पैकी १७ नमुने पॉझिटिव्ह आढळले. सन २०१८ मध्ये आतापर्यंत २१ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी एकही नमुन्याचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आलेला नाही.स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य आजारस्वाईन फ्लूच्या विषाणूंचे तीव्र स्वरूप म्हणजे टॅमी फ्लू होय. यामुळे स्वाईन फ्लूची लागण झाल्यापासूनच ४८ तासांत त्या रुग्णाला टॅमी फ्लूची औषधे द्यावी लागतात. फ्लूच्या विषाणूंच्या लक्षणांच्या वर्णनावरूनच स्वाइन फ्लूच्या ए (एच-१ एन-१) विषाणूचे निदान होते. स्वाईन फ्लूवर सर्वसाधारण फ्लूचेच उपचार केले जातात. डॉक्टरांच्या सल्ल्यावरूनच प्रतिबंधक औषधे दिली जातात. आजाराचे स्वरुप तीव्र असेल, तर स्वतंत्र देखरेखीत ठेवले जाते.असा आहे स्वाईन फ्लूस्वाईन फ्लू हा जुलै २००९ पासून चर्चेचा व मोठ्या चिंतेचा विषय बनला आहे. तथापि, डुकराचे मांस व स्वाईन फ्लू यात काहीच संबंध नाही. हा आजार मनुष्यात तीव्र श्वसनाच्या अनेक लक्षणांसह आढळतो. नाक, डोळे, तोंड यासारख्या घाणेंद्रियांशी संपर्क झाल्यास विषाणूंचे संक्रमण होते. बाधित व्यक्तीकडून खोकला किंवा शिंकण्याने हवेत उडणाऱ्या तुषारातील विषाणू धूलिकणवेष्टित स्वरूपात जिवंत राहतात. खबरदारी न घेतल्यास त्याचा प्रसार वेगाने होऊ शकतो.
अमरावतीवर पुन्हा ‘स्वाईन फ्लू’चे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:35 IST
डेंग्यूपाठोपाठ शहरात स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळल्याने अमरावतीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गतवर्षी स्वाईन फ्लूने महापालिका क्षेत्रात १० बळी घेतल्याने त्या भीतीत वाढ झाली आहे. मात्र, आजाराला न घाबरता खबरदारी हाच उपाय असल्याचे आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे.
अमरावतीवर पुन्हा ‘स्वाईन फ्लू’चे सावट
ठळक मुद्देगतवर्षी १० रुग्णांना मृत्यू४४ जणांना झाली होती लागण