शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

गोड वाणी, संयमी वृत्ती आजारमुक्तीची गुरुकिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:35 PM

गोड बोलणे हे केवळ मानवी संबंधांमध्ये माधुर्य आणण्याचेच उपयोगी सूत्र नव्हे, तर या गुणामुळे आरोग्यही उत्तम राखता येते, असे गुपित प्रसिद्ध कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. अतुल यादगीरे यांनी 'लोकमत'च्या वाचकांसाठी उलगडले.

ठळक मुद्देडॉ. अतुल यादगीरे : रागात घातक हार्मोन्सची निर्मिती

अमरावती - गोड बोलणे हे केवळ मानवी संबंधांमध्ये माधुर्य आणण्याचेच उपयोगी सूत्र नव्हे, तर या गुणामुळे आरोग्यही उत्तम राखता येते, असे गुपित प्रसिद्ध कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. अतुल यादगीरे यांनी 'लोकमत'च्या वाचकांसाठी उलगडले.डॉ. यादगीरे सांगतात, गोड बोलण्यासाठी अंगी संयम बाळगावा लागेल. संयम बाळगण्यासाठी अनावश्यक रागापासून दूर राहावे लागेल. त्याचा लाभ असा होईल की, रागादरम्यानच्या मनोशारीरिक स्थितीत शरीरात उत्पन्न होणारे हानिकारक स्टेरॉइड्स आणि अ‍ॅड्रिनॅलीन हार्मोन्सची गैरजरूरी निर्मिती नियंत्रित होईल. आरोग्य त्यामुळे उत्तम राखले जाईल.हल्ली प्रत्येकाच्या आयुष्यात वाढलेला ताणतणाव आणि ढळलेला संयम ‘सायकोसोमॅटिक’ आजारांना कारणीभूत ठरला आहे. हृदयरोग, मधुमेह, रक्तचाप, कर्करोग, मूळव्याध, लठ्ठपणा यांसारख्या आजारांचा परिचय जवळजवळ प्रत्येक शरीराला आहे. गोड बोलणे आणि 'रिअ‍ॅक्ट' होण्याऐवजी 'रिस्पॉन्स' (प्रतिक्रिया ऐवजी प्रतिसाद) देणे हे अत्यंत महत्त्वाचे. संतुलित आहार, योग्य व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोण आणि परिपूर्ण विश्रांती या चतु:सूत्रीने अशी जीवनशैली हमखास साधता येईल.डोक्यावर बर्फ आणि ओठांवर साखर ठेवावी म्हणतात, ते खरेच. लहान-लहान कारणांमुळे उडणारे खटके आणि त्यातून अंगात भिनणारा राग हे अनारोग्याचे द्वारच. 'तीळ-गूळ घ्या, गोड गोड बोला' हे भारतीय संस्कृतीतील निकोप आरोग्याचे सूत्र पुनरुज्जीवित होणे वैद्यकीयदृष्ट्याही गरजेचे आहे, असे मत डॉ. अतुल यादगीरे यांनी व्यक्त केले.