शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

‘हॉटस्पॉट’मध्येच स्वॅब सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:01 IST

मुंबईहून अमरावती जिल्ह्यात स्वगृही परतलेल्या पाच व्यक्ती आतापर्यंत संक्रमित झाल्याचा अहवाल आला आहे. यामध्ये २५ जूनमध्ये मुंबईहून चांदूर बाजार तालुक्यात आलेली २३ वर्षीय महिला व त्यांच्या तीन वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अचलपूर तालुक्यातील काकडा येथे १ जूनला मुंबईहून परतलेल्या ३० वर्षीय तरुणाचा व ६ जूनला २३ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ठळक मुद्देएमएचओ । शनिवारी महानगरात चार, ग्रामीणमध्ये एक पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मसानगंज, रतनगंज भागात आठवडाभरात हायरिस्क नागरिकांच्या सुविधेसाठी थ्रोट स्वॅब सेंटर सुरू करण्यात येणार आहे. सेंटर असलेल्या नागपुरी गेट भागात संक्रमित रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे हे केंद्र हॉटस्पॉटमध्ये सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार असल्याचे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ विशाल काळे यांनी सांगितले. यादरम्यान शनिवारी महापालिका क्षेत्रात चार व ग्रामीण भागातून एका पॉझिटिव्हची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २७५ वर पोहोचली आहेमसानगंज, रतनगंज आदी परिसरात अलीकडे कोरोनाचे संक्रमित अधिक प्रमाणात निष्पन्न झाले आहेत. यामध्ये संक्रमित रुग्णांसह हायरिस्कमधील नागरिकांचे स्वॅब घेण्यासाठी संबंधितांना केंद्रावर नेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये अनेक भावनिक मुद्देदेखील नागरिक उपस्थित करीत असल्याचा प्रशासनाचा अनुभव आहे. त्यामुळे ज्या भागात रुग्णसंख्या अधिक, त्या ठिकाणी थ्रोट स्वॅब सेंटर सुरू करण्याची जिल्हा व आरोग्य प्रशासनाची भुमिका आहे. यापूर्वी नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत महापालिका शाळेत हे केंद्र सुरू करण्यात आले होते. दुसरे केंद्र कोविड रुग्णालयात व तिसरे केंद्र हे तीन दिवसांपूर्वी पीडीएमसीमध्ये सुरू आहेदरम्यान, शनिवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी बुधवारा येथे भेट देऊन पालिकेच्या पथकांशी चर्चा केली. सर्दी, ताप, खोकला आदी कुठलेही लक्षण आढळणाऱ्या नागरिकांचा सतत पाठपुरावा व आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.आतापर्यंत पाच ‘मुंबई रिटर्न’ संक्रमितमुंबईहून अमरावती जिल्ह्यात स्वगृही परतलेल्या पाच व्यक्ती आतापर्यंत संक्रमित झाल्याचा अहवाल आला आहे. यामध्ये २५ जूनमध्ये मुंबईहून चांदूर बाजार तालुक्यात आलेली २३ वर्षीय महिला व त्यांच्या तीन वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अचलपूर तालुक्यातील काकडा येथे १ जूनला मुंबईहून परतलेल्या ३० वर्षीय तरुणाचा व ६ जूनला २३ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ६ जूनला मुंबईहून अमरावती शहरातील समाधाननगरात परतलेल्या २३ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.पुन्हा पाच पॉझिटिव्ह; एकूण २७५महापालिका क्षेत्रात वडाळी येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. हे वृद्ध एका खासगी रुग्णालयात सुरक्षा रक्षक आहेत. या रुग्णालयातील सहा कर्मचारी आतापर्यंत संक्रमित झाले आहेत. समाधाननगरात चार दिवसांपूर्वी मुंबईहून परतलेल्या २३ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या कुटुंबातील आठ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले, तर अचलपूर तालुक्यातील काकडा येथील २३ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या तरुणाला यापूर्वीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. बडनेरा येथील चावडी चौक परिसरातील ५० वर्षीय महिला तसेच फ्रेजरपुऱ्यांत १२ वर्षांच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याव्यतिरिक्त अचलपुरातील ६० वर्षीय महिला उपचारार्थ नागपूरला दाखल आहे. त्यांची नमुने तपासणी तेथीलच एका खासगी लॅबमध्ये करण्यात आली असता, अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या