शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
13
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
14
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
15
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
16
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

सुवर्णकारांवर बेरोजगारीचे सावट

By admin | Updated: September 15, 2015 00:12 IST

सुवर्णकारांनी कलाकुसरीतून तयार केलेल्या दागदागिन्यांना महाराष्ट्रभरात वाढती मागणी आहे.

५००च्यावर सुवर्णकार : मोठ्या शोरुमच्या आगमनाचा प्रभावअमरावती : सुवर्णकारांनी कलाकुसरीतून तयार केलेल्या दागदागिन्यांना महाराष्ट्रभरात वाढती मागणी आहे. मात्र, अलिकडे मोठमोठ्या शहरातील सुवर्णपेढ्यांच्या लखलखीत शो-रूम शहरात स्थापित झाल्यानंतर स्थानिक सुवर्णकारांनावर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. जिल्ह्यात सुमारे दीड हजार तर शहरात ५०० च्या जवळपास सुवर्णकारागीर आहेत. मात्र, अलीकडे तयार दागिन्यांना अधिक पसंती मिळत असल्याने सुवर्ण कारागिरांना बेरोजगारीचे संकट भेडसावत आहे. जिल्ह्यात दीडहजार सुवर्णकार असून त्याच्या माध्यमातून विविध सुवर्ण कारागिर कोट्यवधींचे सोन्याचे दागिने बनवीत आहे. सराफा बाजारात ४०० च्यावर छोटे-मोठे व्यवसायिक आहेत. दिवाळी- दसऱ्यासारख्या मोठ्या सणांमध्ये प्रत्येक दुकानदाराकडे खरेदीदारांची धूम असते. तसेच वर्षभर ग्राहक काही ना काही सोन्याची खरेदी करतात. सराफ्यातील छोटे व्यावसायिक सिझनमध्ये दरदिवसाला १ ते २५० ग्रॅमपर्यंत सोन्याच्या दागिन्यांची विक्री करतात. मोठे व्यावसायिक १ ते अर्धा किलोपर्यंतच्या सोन्याची विक्री करीत असल्याचे आढळून आले आहे. प्रत्येक व्यवसायिकांकडे ५ ते १५ कारागीर आहेत. छोट्या दुकानांमध्ये कार्यरत कारागिरांना ३ ते ४ हजार रूपये वेतन दिले जाते. मोठ्या दुकानातील अथवा शोरूममधील कारागिरांना ५ ते १० हजार रूपयांपर्यंत वेतन दिले जाते. ही मोठी तफावत पाहायला मिळत आहे. नथनीपासून मोठमोठ्या हारांपर्यंतचे विविध दागिने सुवर्णकार ग्राहकांसाठी तयार करतात. या व्यवसायातूनच जिल्ह्यात दीड हजार सुवर्णकार आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांत सोन्याच्या कारागिरांचे सुगीचे दिवस ओसरत असल्याचे दिसून येत आहे. शहरात मोठया व्यापाऱ्यांनी पाय पसरल्यामुळे बहुतांश दागिने मशिनद्वारेच तयार करण्यात येत आहेत. राज्याबाहेरील सुवर्ण कागागीर अमरावतीत दाखल झाल्याने स्थानिक कारागिरांना घरी बसावे लागत आहे.जळगाव, अमृतसर, मुंबईहून रेडिमड दागिनेअमरावतीत सोन्या-चांदीचे ८०० च्या जवळपास व्यापारी असून ते स्वत: दागिने तयार करतात. तसेच काही जण जळगाव, अमृतसर, मुंबई व अन्य काही मोठ्या शहरातून रेडिमेड दागिने बोलावितात. त्यामुळे अमरावतीही सुवर्ण कारागिरांच्या कामावर मोठ्या प्रभाव पडला आहे. सर्वच दागिने रेडिमेड मिळत असल्यामुळे सुवर्णकारांकडील कामे सद्यस्थितीत फारच कमी झाली आहेत.