वकील संघाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनअमरावती : जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र काळे यांनी उध्दट वागणूक दिल्याचा आरोप करीत त्यांना निलबिंत करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन शनिवारी वकील संघाच्यावतीने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना सादर करण्यात आले. स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत वकिल संघाच्या ग्रंथालयातील पुस्तकांसाठी ५० हजारांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे वकील संघाचे अध्यक्ष नंदकिशोर कलंत्री हे कार्यकाररिणी संदस्यासोबत जिल्हा नियोजन अधिकारी काळे यांची भेट घेण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी गेले होते. त्यांनी प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकास विचारणा करून जिल्हा नियोजन अधिकारी काळे यांच्या कक्षात प्रवेश केला. त्यांनी ग्रंथालयाच्या पुस्तकाविषयी काळे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. असता काळे यांनी हातातील पेन टेबलावर आपटून आधी नाव विचारले. त्यानंतर तु्म्ही आत प्रवेश कसा असा जाब विचारला. अशाप्रकारे उध्दट वागणूक केल्याचा वकिल संघाचा आरोप आहे. यासंदर्भात वकिल संघाने पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून एकमताने जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांचा निषेध नोंदविला. शनिवारी वकील संघाचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून जिल्हा नियोजन अधिकारी काळे यांना निलंबीत करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी वकील संघाला दिले आहे. सात ते आठ दिवसांत योग्य ती कारवाई अपेक्षा वकील संघाने केली आहे. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष नंदकिशोर कलंत्री, सचीव संजय पवार, उपाध्यक्ष प्रशांत देशमुख, ग्रंथालय सचीव नवनीत कोठाळे, सुदर्शन अभ्यंकर, नितीन चंदेल , दिपा देशमुख, प्रशांत देशपांडे आदि उपस्थित होते. यासंदर्भात वकिल संघातर्फे विधी व न्याय राज्यमंत्री रणजित पाटील व बार कॉन्सीलचे प्रशासक आशिष देशमुख यांनाही निवेदन देण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र काळे यांच्या मोबाईलवर संपर्क केला असता त्यांनी वैयक्तिक काम सांगून प्रतिसाद दिला नाही. (प्रतिनिधी)
नियोजन अधिकाऱ्याला निलंबित करा
By admin | Updated: December 20, 2015 00:07 IST