सातेगाव फाट्याहून सातेगावचे अंतर पाच किमी आहे. या संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. ज्यामुळे रोज लहान मोठे अपघात घडतात. सातेगाव येथून अंजनगांवला दररोज ये जा करणारे नागरिक या रस्त्यामुळे प्रचंड त्रासले आहेत. सबब, प्रहारचे तालुका अध्यक्ष प्रदीप निमकाळे यांच्या नेतृत्त्वात १ फेब्रुवारी रोजी साबां विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सनी शेळके, राजेश ढोक, अवि टाक, अभिजित कात्रे, निखिल कडू, सचिन गावंडे, निवृत्ती गळसकार, राम नळकांडे, रणजित इंगळे, हरिनारायन ढोले, सुजित काठोले, राजू पडोळे उपस्थित होते.
---------------------