शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत अंध-अपंगांसाठी पुरणपोळीचा बेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 21:54 IST

शहरात दीनदुबळ्यांना सणासुदीला गोडधोड खाऊ घालणाºया विठ्ठल सोनवळकर यांच्या भाजीपोळी केंद्रात येत्या दिवाळीला दोन दिवस पुरणपोळीचा बेत आखला आहे.

ठळक मुद्देविठ्ठलराव सोनवळकर : भाजीपोळी केंद्रात दोन दिवस मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात दीनदुबळ्यांना सणासुदीला गोडधोड खाऊ घालणाºया विठ्ठल सोनवळकर यांच्या भाजीपोळी केंद्रात येत्या दिवाळीला दोन दिवस पुरणपोळीचा बेत आखला आहे. १७ व १८ रोजी भाजीपोळी केंद्रात शहरातील अपंगांना मोफत पुरणपोळीचे भोजन दिले जाणार आहे. २८ वर्षांपासून विठ्ठलरावांचे भाजीपोळी केंद्र सुरू आहे. या माध्यमातून त्यांची सेवा अखंड सुरू आहे. राष्टÑीय सणांना शहरातील अंध-अपंगांना पक्वान्नाचे भोजन ते देतात. त्यात एकदाही खंड पडला नाही.या उपक्रमाव्यतिरिक्त शहरातील रुग्णालयात रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पाच रूपयात तीन पोळ्या, वाटीभर भाजी व वरण देण्याचा त्यांचा नित्योपक्रम आहे. अंबागेटच्या आत एका १० बाय १० च्या खोलीत त्यांचे हे भाजीपोळी केंद्र सुरू आहे. बालपणी आपल्या वाट्याला आलेले वाईट दिवस इतरांच्या वाट्याला येऊ नयेत, अंध-अपंगांनाही सणासुदीला गोड घास मिळावेत. या उद्देशाने त्यांनी हे केंद्र सुरू केले आहे. जुना कॉटन मार्केट परिसरात हातगाडीवर गॅस वेल्डींगचा व्यवसाय करून त्यातील मिळकतीवर ते हे भाजीपोळी केंद्र चालवितात. अन्न यज्ञाच्या माध्यमातून समाजाची अखंड सेवा करणाºया विठ्ठलरावांच्या कार्याला तोड नाही.