शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्यच ! अमरावतीतील अग्निशमन वाहन दोन कोटींचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 15:40 IST

बाजारभावाची शहानिशा न करता दुप्पट दराने खरेदी केलेल्या ‘मल्टियुटिलिटी फायर रेस्क्यू वाहना’मुळे महापालिकेचे अग्निशमन विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

ठळक मुद्देअग्निशमन विभाग संशयाच्या भोवऱ्यात

प्रदीप भाकरे ।आॅनलाईन लोकमतअमरावती : बाजारभावाची शहानिशा न करता दुप्पट दराने खरेदी केलेल्या ‘मल्टियुटिलिटी फायर रेस्क्यू वाहना’मुळे महापालिकेचे अग्निशमन विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. तब्बल २ कोटी ४ लाख रुपये खर्चून खरेदी केलेल्या या वाहनासाठी विभागाने राबविलेल्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आले आहेत. राष्टय बाजारपेठेत ७० लाख ते १ कोटीत उपलब्ध होणाऱ्या वाहनासाठी २ कोटी ४ लाख रुपये खर्च करण्याची बाब कुणाच्याही पचनी पडली नसून, एवढ्या किमतीत हेलिकॉप्टर घेतले काय, अशी उपरोधिक प्रतिक्रिया उमटली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या अनियमिततेबाबत तक्रार करण्यात आली असून महापालिकेची फसवणूक करणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करावी तसेच निधी एंटरप्रायजेस या कंपनीला दिलेली वर्क आॅर्डर रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

असे आहेत आक्षेपवाहनासाठी अग्निशमन विभागाने ‘ईओआय’ (एक्स्प्रेशन आॅफ इंटरेस्ट) मागितले नाहीत. प्री-बीड मीटिंग बोलावण्यात आली नाही. वाहनाची किंमत माहीत करण्यासाठी स्थानिक वा राष्टय वृत्तपत्रात जाहिरात देऊन पुरवठादार किंवा कंपनीकडून कोटेशन मागविण्यात आले नाही. टेंडर नोटीसमध्ये वाहनाची किंमत देण्यात आली नाही. चेसीस खरेदीकरिता कोटेशन वा निविदा बोलाविण्यात आली नाही. स्वत: पुरवठादार हा मॅन्यूफॅक्चरर नसताना केवळ ‘अथॉरायझेशन सर्टिफिकेट’च्या आधारे पुरवठा आदेश देण्यात आले.

उपायुक्तांसह अग्निशमन अधिकाऱ्यांवर आरोपउपायुक्त नरेंद्र वानखडेंसह अग्निशमन अधीक्षक भारतसिंह चव्हाण संशयाच्या भोवऱ्यात आहेत. मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या सोळा पानी तक्रारीत तथाकथित कन्सल्टंट संदीप देशमुखही आहेत. निविदाप्रक्रिया मॅनेज केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.मल्टियुटिलिटी फायर रेस्क्यू वाहन खरेदीत कुठलीही अनियमितता झालेली नाही. तक्रारकर्त्याला संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्यानंतरही त्यांनी तक्रार केलेली असून, याबाबत मला भाष्य करता येणार नाही.- भारतसिंह चव्हाण, अधीक्षक, अग्निशमन विभाग महापालिका

टॅग्स :Governmentसरकार