पश्चिम विदर्भातील रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रियेसाठी नागपूर, मुंबईला जाणे परवडणारे नसल्याने त्यांच्या सोयीकरिता येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले. तेथे किडनी प्रत्यारोपण, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, मूत्रपिंड, प्लास्टीक सर्जरी आदी शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत होत होत्या. मात्र, दोन वर्षांत केलेल्या शस्त्रक्रियेचे एकही रुपया त्या सोळाही डॉक्टरांना देण्यात आलेला नसल्याने ते १ सप्टेंबरपासून संपावर गेले आहेत. परिणामी तेथील शस्त्रक्रिया बंद असल्याने अनेक रुग्णांना इमर्जंसी शस्त्रक्रियेसाठी धावपळ करावी लागत आहे. रुग्णांची ही परवड थांबविण्यासाठी भाजपक्षाचे शहराध्यक्ष किरण पातुरकर, माजी कृषिमंत्री अनिल बोंडे, प्रताप अडसड यांनी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याशी चर्चा करून डॉक्टरांना सेवेत रुजू होण्याचे आदेश देण्याची मागणी डॉ. अनिल बोंडे यांनी केली. यावेळी
बॉक्स
जिल्ह्यातील दोन्ही मंत्री बँक निवडणुकीत व्यक्त
जिल्ह्यात दोन मंत्री असून ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. त्यांना रुग्णाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. जोपर्यंत हॉस्पिटल सुरू करण्याबाबत आदेश येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी सांगितले.